आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेशी संरक्षण करार, खरेदी करणार 22 अपाचे व 15 शिनूक हेलिकॉप्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारपासून सुरूहोणाऱ्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने मंगळवारी अमेरिकेशी अडीच अब्ज डॉलर्सच्या (१६ हजार ४७० कोटी) संरक्षणविषयक करारास मंजुरी दिली. यानुसार बोईंग कंपनीकडून २२ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर व १५ शिनूक हेलिकॉप्टर खरेदी केले जातील.

संरक्षणविषयक सूत्रांनुसार, अपाचे हेलिकॉप्टर खरेदीसाठी बोईंगसोबत एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील. तर, या हेलिकॉप्टरसोबत असलेली शस्त्रे, रडार व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी अमेरिकी सरकारशी करार करून त्यावर स्वाक्षऱ्या केल्या जातील. या हेलिकॉप्टर्सच्या किमतीवरून दोन्ही देशांत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर २०१३ मध्ये या करारास अंतिम रूप देण्यात आले होते. गेल्या जूनमध्ये अमेरिकी संरक्षण मंत्री एश्टन कार्टर यांच्या दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या होतील, अशी आशा होती. मात्र, तेव्हा हा करार टळला. या करारानुसार व्यवहार झाल्यानंतर आणखी ११ अपाचे व ४ अतिरिक्त शिनूक हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. दरम्यान, हेलफायर क्षेपणास्त्रे व रॉकेट खरेदीसाठी पण अमेरिकेशी करार केला जाणार आहे.
करारातील ३० टक्के गुंतवणूक भारतात
संरक्षण विभागाच्या सूत्रांनुसार, ऑफसेट धोरणाअंतर्गत या करारात खास तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार अमेरिकी कंपनीला या व्यवहारातील एकूण ३० टक्के रक्कम भारतात गुंतवावी लागणार आहे. संरक्षणविषयक खरेदीच्या धोरणाअंतर्गत २००५ मध्ये प्रथमच गुंतवणुकीसंबंधी हे ऑफसेट धोरण लागू करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अपाचे, शिनूकची वैशिष्ट्ये आणि अमेरिकेशी झालेले मोठे करार