आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Call Off Meeting Of Foreign Secretary, Divya Marathi

हेकेखोर पाकिस्तान: पाक उच्चायुक्तांनी घेतली गिलानींची भेट, आंदोलकांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी.
नवी दिल्ली - काश्मिरातील फुटीरतावादी नेत्यांची पाकिस्तानच्या भारतातील राजदूताने भेट घेतल्यामुळे भारताने भलेही कडक भूमिका घेत परराष्ट्र सचिवस्तरीय बोलणी रद्द केली असली तरी, पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांच्या वागणूकीत तसूभरही बदल झालेला नाही. काश्मीरचे फुटीतावादी नेते मंगळवारी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित भेटीवर अडून बसले आहेत.
सध्या सय्यद अली शाह गिलानी यांची बासीत यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. त्याआधी गिलानी पाकिस्तानच्या दुतावासात पोहोचले तेव्हा या भेटीला विरोध दर्शवणा-यांनी निदर्शने केली.
पोलिसांनी खबरदारी म्हणून काही जणांना ताब्यातही घेतले. दुतावासाबाहेर मोठ्या प्रमाणावर फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. काही तासांनी आणखी एक फुटीरतावादी नेते मीरवाइज उमर फारुखही बासीत यांची भेट घेणार आहेत.
गिलानी यांनी भेटीपूर्वीच स्पष्ट केले होते की, सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली असली तरी, दिल्लीला जाऊन पाकिस्तानच्या उच्चायुक्तांची भेट घेतली जाईल. सरकारला हवे असेल तर त्यांनी आपल्याला अटक करावी. भारताला या मुद्यावर शांतीच्या मार्गाने तोडगा नको असल्याचेही गिलानी म्हणाले होते.
काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मीरवाइज उमर फारुख आणि सय्यद अली शाह गिलानी मंगळवारी अब्दुल बासित यांची भेट घेऊ शकतात. जर ही भेट झाली तर भारत आणखी कडक भूमिका घेऊ शकतो.

भारताच्या विरोधानंतरही फुटीरतावाद्यांशी चर्चा
सोमवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सरकारला त्यांच्या उच्चायुक्तांनी फुटीरतावाद्यांना भेटू नये असे सांगितले होते. मात्र, पाकिस्तानने भारताच्या सुचनेला न जुमानता फुटीरतावाद्यांची भेट घेतली. फुटीरतावादी नेते शब्बीर शाह यांनी ज्यांच्याशी संबंधित मुद्दा आहे, त्यांच्याशी चर्चा नाही करायची तर कोणाबरोबर करायची? असा सवाल उपस्थित करत या चर्चेत काही गैर नसल्याचे म्हटले. भारत सरकारने ही भेट म्हणजे पाकिस्तानची नकारात्मक भूमिका आणि भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये विनाकारण दखल देण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या विरोधात पहिला मोठा निर्णय घेत दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये 25 ऑगस्टला होणारी चर्चा रद्द करण्याची घोषणा केली आहे.

गृह मंत्रालयात बैठक
या बैठकीच्या पार्शवभूमीवर भारत सरकार दक्ष झाले आहे. त्यासंदर्भात केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात गृह मंत्रालयात एक बैठक सुरू आहे. बैठकीत या भेटीमुळे काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान म्हणाले, प्रयत्नांना धक्का
भारताने परराष्ट्र सचिवांची चर्चा रद्द करण्याची घोषणा केल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना धक्का लागल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा होण्याआधी फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याची परंपरा असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या म्हणाल्या की, भारत सरकारच्या निर्णयाने भारताबरोबर एक चांगले शेजारी राष्ट्र म्हणून संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, चर्चा रद्द करण्याचमागची तीन संभाव्य कारणे