आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Can Become $10 Trillion Economy In Over 2 Decades: Pranab Mukherjee

भारतीय अर्थव्यवस्था 10 लाख कोटी डॉलरची; राष्ट्रपतींनी व्यक्त केला विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जागतिक स्पर्धेत भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून येत्या दोन दशकांत भारतीय अर्थव्यवस्था १० लाख कोटी डॉलर (६५० लाख कोटी रुपये)ची होणार असल्याचा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला. दिल्लीमध्ये आयोजित ३५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मेक इन इंडियाबरोबरच आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसारख्या निर्यातदार बाजारावरदेखील लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. उत्पादनाबाबत हे बाजार सध्या मोठ्या प्रमाणात पुढे येत असून यावर लक्ष केंद्रित केल्यास एक्स्टर्नल क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो, असेही ते म्हणाले.