आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानसोबत पुढील आठवड्यात होणारी सागरी संरक्षण चर्चा रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानसोबत पुढील आठवड्यात होणारी सागरी संरक्षण चर्चा (मॅरिटाईम सिक्युरिटी डायलॉग) भारताने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना एकतर्फी फाशीची शिक्षा सुनावल्याच्या विरोधात भारताने हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, भारताने गेल्या वर्षभरात 14 वेळा कुलभूषण जाधव यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तरीही, पाकिस्तानने अद्याप त्यांना भेटीची परवानगी दिली नाही.
 
16, 17 एप्रिलला होता पाक शिष्टमंडळाचा दौरा
- पाकिस्तान मॅरिटाईम सिक्युरिटी एजंसी (एमएसए) चे शिष्टमंडळ 16 आणि 17 एप्रिल रोजी सागरी सुरक्षेच्या मुद्यावर भारत दौरा करणार होते. यात प्रामुख्याने दोन्ही देशांचे मच्छिमार आणि त्यांच्या शोध मोहिमेवर चर्चा अपेक्षित होती.
- तटरक्षक दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संरक्षण मंत्रालयाने पाक शिष्टमंडळाला भारतात येण्याची परवानगीच दिली नाही. 
 
पाकिस्तानने याच आठवड्यात भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना कथित दहशतवाद आणि हेरगिरी प्रकरणी एकतर्फी निकाल देत फाशीची शिक्षा सुनावली. यावरून दोन्ही देशांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तान जाधव यांना फाशी देत असेल तर, तो पूर्वनियोजित खून ठरणार अशी भूमिका भारताने यापूर्वीच स्पष्ट केली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...