आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India, China DGMO level Talks From Apr 22 News In Divya Marathi

चीन-भारत लष्कर महासंचालकांची 22 रोजी बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नियंत्रण रेषेवरील अतिक्रमणाच्या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी येत्या 22 एप्रिल रोजी भारत आणि चीन लष्कराच्या महासंचालकांची (डीजीएमओ) बैठक पार पडणार आहे.

दोन्ही देशांच्या डीजीएमओ र्शेणीच्या अधिकार्‍यांदरम्यानच्या बैठकीचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. सीमारेषेवर परस्परांतील संबंध चांगले ठेवण्याच्या दृष्टीने ही बैठक निश्चित करण्यात आली होती. 22 एप्रिल रोजी चीनचे डेप्युटी चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल छी च्येंग क्वो आणि भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल पी.आर.कुमारच्या यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय लष्करी शिष्टमंडळांदरम्यान चर्चा होईल.

मागच्या वर्षी दोन्ही देशांदरम्यान सीमा सुरक्षा सहयोग करारही (बीडीसीए) झाला आहे. या करारांतर्गतच दोन्ही देशांनी डीजीएमओ स्तरावर बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चेनंतर 23 एप्रिल रोजी चिनी लष्कर दल भारताचे संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांची भेट घेतील. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात दौलत बेग ओल्दीमध्ये चीनच्या सैनिकांकडून घुसखोरीची घटना घडली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सीमेवरील तणावाच्या स्थितीतून वाचण्यासाठी विविध उपाययोजनांसंदर्भात चर्चाही केली होती.