आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकलामवर तडजोड अशक्य; भारतानेच सिक्कीममधून आपले सैन्य हटवावे -चिनी मीडिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनहुआने आणखी एक इशारा जाहीर केला. (फाईल) - Divya Marathi
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनहुआने आणखी एक इशारा जाहीर केला. (फाईल)
बीजिंग - सिक्कीमच्या डोकलाम परिसरात चीनच्या अनाधिकृत बांधकामावरून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असताना चिनी माध्यम दररोज नवीन धमक्या देत आहेत. त्यातच रविवारी चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनहुआने आणखी एक इशारा जाहीर केला. त्यानुसार, चीन डोकलाम परिसरावर कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. उलट भारताने सिक्कीममधून सैन्य हटवल्याशिवाय चर्चा अशक्य आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने वाद निवळण्यासाठी दोन्ही देशांत चर्चेचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर चिनी मीडियाने ही प्रतिक्रिया दिली आहे. 
 

- शिनहुआ चीनच्या स्टेट काउंसिल अंतर्गत काम करणारी आणि अधिकृत वृत्तसंस्था आहे. या वृत्तसंस्थेने आपल्या अग्रलेखात लिहल्याप्रमाणे, चीनसाठी बॉर्डर लाइन हीच बॉटम लाईन आहे. अर्थात सीमा प्रश्नी कुठल्याही प्रकारची तडजोड चीनला अमान्य आहे. 
- चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने अशा प्रकारची भाषा वापरण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या आठवड्यात शिन्हुआ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे दैनिक पीपल्स डेलीने आपल्या अग्रलेखात भारतावर आगपाखड व्यक्त केली होती. 
- अग्रलेखानुसार, चीनने भारताला डोकलाम परिसरातून वेळोवेळी माघार घेण्याचे आवाहन केले. तरीही भारताने त्यावर दुर्लक्ष करून वाद कथितरीत्या आणखी वाढवला. चीनचे ऐकण्यास नकार देणाऱ्या भारताला पश्चाताप करावा लागेल असा इशाराही शिनहुआने दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...