आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत, चीनच्या सैनिकात धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ आला समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
VIDEO: लडाखमध्ये रत-चीन सैनिकांच्या धक्काबुक्कीची ही घटना 15 ऑगस्टची आहे. - Divya Marathi
VIDEO: लडाखमध्ये रत-चीन सैनिकांच्या धक्काबुक्कीची ही घटना 15 ऑगस्टची आहे.
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चीनच्या सैनिकात धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. घुसखोरीचा दावा फेटाळणाऱ्या चीनचे पितळ उघड पडलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी घुसखोरी केल्याचा दावा चीनकडून फेटाळण्यात आला होता. मात्र भारत आणि चीनच्या सैनिकात धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
 
भारत-चीन सैनिकांच्या धक्काबुक्कीची ही घटना 15 ऑगस्टची आहे. पँगाँग सरोवर परिसरात भारत आणि चिनी लष्कराचे गस्ती पथक आमनेसामने आले होते. यावेळी चीनच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतर्क भारतीय सेनादलांनी तो वेळीच उधळून लावला. यावेळी चिनी सैनिकांना अटकाव करताना दोन्ही बाजूंकडून झालेल्या दगडफेकीत काही सैनिक जखमी झाले. काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले होते.
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...