आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India, China In Speedboat Face Off Days Before Panchsheel Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपराष्‍ट्रपतींच्या बीजिंग दौर्‍यापूर्वीच चिनी ड्रॅगन्सनी भारतीय हद्दीत केली होती घुसखोरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाची उपराष्‍ट्रपती हामिद अन्सारी चीन दौर्‍यावर आहेत. दुसरीकडे, चिनी ड्रॅगन्सनी भारतीय सीमेत पाच किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्व लद्दाखमधील पेंगोंग तलावाच्या परिसरापर्यंत ड्रॅगन्सने मजल मारली होती. मात्र, भारतीय जवानांना च‍िनी ड्रॅगनला हुसकावून लावले.
हम‍िद अन्सारी 26 जूनला चीन दौर्‍यावर रवाना झाले. वणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारमण या त्यांच्यासोबत आहेत. बीजिंगमधील पंचशील कराराच्या 60 वा वर्धापनदिनानिमित्त उपराष्ट्रपती चीन दौर्‍यावर गेले आहेत. यानिमित्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांची ते भेट घेतील.

हाय स्‍पीड इंटरसेप्‍टर बोटीत बसून आले होते चिनी ड्रॅगन...
'
हिंदुस्‍तान टाइम्‍स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 24 जूनला चीनमधील 'पीपल्‍स लिब्रेशन आर्मी'चे जवान हाय स्‍पीड इंटरसेप्‍टर बोटीत बसून आले होते. पूर्व लद्दाखमधील पेंगोग तलावात जवळपास 5 किलोमीटर अंतरापर्यंत त्यांनी घुसखोरी केली होती. तलावाचा सर्वाधिक भाग चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेतमध्ये येतो.

चिनी जवान हाय स्‍पीड इंटरसेप्‍टर बोटने भारतीय हद्दील घुसखोरी केल्याचे पाहताच भारतीय जवानांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार होतेच. भारतीय जवानांच्या एका तुकडीने अमेरिका निर्मित इंटरसेप्‍टर बोटमध्ये बसून त्यांना हुसकावून लावले. भारतीय जवानांच्या अथक परिश्रमानंतर अखेर चिनी ड्रॅगनने माघार घेतली. चिनी जवानांनी हुसकावून लावण्यासाठी भारतीय जवानांना तब्बल दोन तास संघर्ष करावा लागला.
नरेंद्र मोदी सरकार भारत आणि चीन यांच्यातील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, चिनी सैनिकांचा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा नापाक इरादा आहे. दोन्ही देशातील संबंध मोठ्या व्यावसायिक करारातून सुधारतील, असे मत जानकारांनी व्यक्त केले आहे.

लद्दाखमधील 'पेंगोंग तलाव हा भारताच्या जुन्या आठवणीशी संबंधित आहे. 1962 मध्ये युद्धभूमी म्हणून या परिसराचा वापर झाला होता. लाइन ऑफ एक्‍चुअल कंट्रोलया चीनकडून वारंवार होणारी घुसखोरी आधीपासून भारताची डोकेदुखीचा विषय बनला आहे.

पेंगोंग तलाव समुद्र सपाटीपासून सुमारे 4350 मीटर उंचीवर आहे. या तलावाचा विस्‍तार 134 किलोमिटरपर्यंत आहे. या तलावातील पाण्यावरून चीन आणि भारतीय सैन्यात तब्बल 12 वेळा संघर्ष झाला आहे. चीनने आपल्या क्षेत्राचा विकास सुरु केला आहे. दुसरीकडे भारताची चिंता वाढली आहे.
(फाइल फोटो: पूर्व लद्दाखमधील पेंगोंग तलाव)