आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China, India Move Closer To Military Hotline: Manohar Parrikar

भारत-चीन लष्करादरम्यान हॉटलाइन, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताने पठाणकोट हल्ल्यातील मास्टरमाइंड मसूद अझहरसह अनेक मुद्द्यांवर चीनशी चर्चा केली. देश दहशतवाद्यांत भेद करत नाही. दहशतवादी तो दहशतवादीच, असे चीनला ठणकावून सांगण्यात आले आहे. त्याशिवाय दोन्ही देशांतील सुरक्षेच्या पातळीवर संवाद वाढवण्यासाठी उभय देशांच्या लष्करात यापुढे हॉटलाइन सुरू करण्यात आल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

चीनच्या पाचदिवसीय दौऱ्यानंतर मायदेशी परतलेले पर्रीकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दौऱ्याची सविस्तर माहिती दिली. पाकिस्तानव्याप्त काश्मीर भागात चिनी तुकड्यांची घुसखोरी, सीमाप्रश्न आणि लष्कराच्या उच्चाधिकारी पातळीवरील हॉटलाइनच्या मुद्द्यावर भारताने आपली भूमिका आणि चिंता व्यक्त केली. हॉटलाइन स्थापन करण्यास चीनने सहमती दर्शवली आहे. मसूद अझहरच्या मुद्द्यावर भारताची भूमिका चीनसमोर स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. चीनने अझहरचा उल्लेख विशेष अशा स्वरूपात केला होता. परंतु भारत दहशतवाद्याला दहशतवादीच मानतो. त्यात सामान्य आणि विशेष असा फरक करत नाही. अशा प्रकारे चीनसमोर भारताने
स्पष्टपणे काही चिंता व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. संरक्षण आणि सार्वभौमत्वासंबंधीचे प्रश्नही मांडण्यात आले. या मुद्द्यांवर चीनचे स्वत:ची काही मते आहेत. परंतु आपण मुद्दे उपस्थित करण्यात कसलाही संकोच ठेवलेला नाही. जेणेकरून भविष्यात सीमांवर अनपेक्षित किंवा आगळीक घडणार नाही. दोन्ही देशांतील संरक्षण संबंधीचा सामंजस्य करार पूर्णत्वाकडे आला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, राफेल सौदा अद्याप पूर्ण नाही... मुखर्जी चीन भेटीवर...