आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Clears $2.5 Billion Deal For US Military Helicopters

15800 कोटींच्‍या हेलिकॉप्टर्स खरेदीला मंजुरी; मोदींच्‍या दौऱ्यापूर्वीच निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: अपाचे हेलिकॉप्टर. - Divya Marathi
फाइल फोटो: अपाचे हेलिकॉप्टर.
नवी दिल्ली - भारतीय वायुदलाची मारक क्षमता वाढवण्‍यासाठी अमेरिकेकडून 22 'अपाचे' आणि 15 शिनूक हेलिकॉप्टर खरेदीला आज (मंगळवार) केंद्रीय सुरक्षा समितीने मंजुरी दिली. पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बुधवारपासून अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. त्‍यापूर्वी 2.5 बिलियन डॉलरच्‍या ( जवळपास 15800 कोटी रुपये ) या व्‍यवहारावर शिक्‍कामोर्तब झाला आहे. अमेरिकेतील एव्‍हीएशन कंपनी बोइंगकडून ते घेतले जाणार आहेत.
भारतीय वायू दलाला अजून बळकट करण्‍यासाठी वर्ष 2009 पासूनच हे हेलिकॉप्‍टर घेण्‍याची प्रक्रिया सुरू झाली होती. डिसेंबर 2012 पर्यंत भारतीय सेवेत हे हेलिकॉप्‍टर दाखल होतील, अशी अशा होती. मात्र, वित्‍त मंत्रालयाकडून मंजुरी भेटली नसल्‍याने हा व्‍यवहार रखडला. पुढे या प्रस्‍तावात 13 वेळा दुरुस्‍ती झाली.
का केली घाई?
भारताला हे हेलिकॉप्‍टर 30 सप्‍टेंबरपूर्वीच घ्‍यावे लागणार होते. कारण त्‍यानंतर त्‍यांच्‍या किंमतीमध्‍ये 40 टक्‍के वाढ करण्‍याचा निर्णय अमेरिकेच्‍या आर्मी सिक्युरिटी असिस्टेंस कमांडने घेतला. परिणामी, भारताचे केंद्रीय सुरक्षा मंत्री मनोहर पर्रिकर, एनएसए अजीत डोभाल आणि वित्त मंत्री अरुण जेटली यांनी बाबत बैठक बोलावली. यामध्‍ये वित्‍त मंत्रालयाने खरेदी करण्‍याची परवानगी दिली.
काय आहे या हेलिकॉप्टर वैशिष्‍ट
>Apache AH 64D हेलिकॉप्टर सर्वच हिवाळा, पावसाळा आणि उन्‍हाळा अशा सर्व हवामानात चांगल्‍या प्रकारे काम करते. अवघ्‍या एका मिनिटांत ते 128 टारगेटला ट्रॅक करून त्‍यातील16 वर निशाना लावण्‍याची त्‍याची क्षमता आहे. शिवाय ते रडार आणि मिसाइल सेंसरपासून लपू शकते. रात्रीच्‍या वेळीसुद्धा ते काम करू शकते.

>शिनूक टि्वन रोटर हेलिकॉप्टर आहे. अमेरिकेने या हेलिकॉप्टरच्‍या माध्‍यमातून अफगानिस्तान आणि इराकमध्‍ये युद्ध मोहीम केले. उंच जागेवर जवानांना पाठवण्‍यासाठी ते खूप उपयुक्‍त आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटो..