आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Developing Robotic Soldiers To Replace Humans In Warfare

भारत विकसित करतोय यंत्रमानव सैनिक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारत यंत्रमानव सैनिक विकसित करीत आहे. भविष्यातील युद्धनीती विचारात घेऊन संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) या क्षेत्रात संशोधन सुरु असल्‍याची माहिती सुत्रांनी दिली. मानवरहित युद्ध यंत्रणा विकसित करण्यासाठी हे प्रयत्‍न सुरु आहेत. काही मोजकेच देश या क्षेत्रात काम करीत आहेत. हे प्रयत्‍न यशस्‍वी झाल्‍यास हॉलिवूडच्‍या काही चित्रपटांमध्‍ये दाखविल्‍याप्रमाणे युद्धे लढली जातील.

डीआरडीओने हाती घेतलेल्या या प्रकल्पांतर्गत उच्च बुद्धीमत्ता असलेले आणि शत्रु व मित्र यांच्यामध्ये फरक करू शकणारे यंत्रमानव विकसित करण्यात येणार आहेत. अशा यंत्रमानवांना दुर्गम ठिकाणच्‍या युद्धस्‍थळी मोहिमांवर पाठविण्‍यात येईल. यामुळे युद्धातील जीवितहानी रोखता येईल. आज चर्चेत असलेल्या बुद्धीमत्तेच्या पातळीपेक्षा अत्यंत उच्च दर्जाची बुद्धीमत्ता असणारा यंत्रमानव विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा नवीन कार्यक्रम असून अनेक प्रयोगशाळांनी या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली आहे, असे डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदर यांनी सांगितले.

अवकाश व जमिनीवरील मानवरहित युद्ध हे युद्धनीतीचे भविष्य असून त्‍यासाठी यंत्रमानव सैनिक विकसित करणे ही आपली प्राथमिकता असल्याचे चंदर यांनी सांगितले. सुरुवातीला यंत्रमानव मानवी सैनिकास सहाय्य करतील. परंतु, ही यंत्रणा पूर्ण विकसित झाल्यानंतर मानवी सैनिक यंत्रमानवाला सहाय्य करू लागतील, असा विश्‍वास चंदर यांनी व्यक्त केला.