आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवयानीच्या राजनैतिक सवलतीसाठी भारताचे संयुक्त राष्ट्राला साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रे -अमेरिकेतील भारतीय मुत्सद्दी देवयानी खोब्रागडे यांना विशेष राजनैतिक सवलत आणि सर्व विशेषाधिकार देण्याची मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे (यूएन) मागितली आहे. देवयानी यांना नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या भारतीय मोहिमेवरील दूत म्हणून पाठवण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजदूत अशोक मुखर्जी यांनी सरचिटणीस बान की मून यांना पाठवलेल्या पत्रात राजनैतिक सवलत मागितली आहे. या पत्रासोबत अन्य कागदपत्रेही देण्यात आली आहेत. भारताकडून अशी विनंती प्राप्त झाल्याचे संयुक्त राष्ट्राने अधिकृतपणे म्हटले आहे. भारताच्या या विनंतीवर मानक प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.
संयुक्त राष्ट्राकडून अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला कागदपत्रे पाठवणे बाकी आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला त्या कागदपत्रांवर उत्तर देणे आहे. आता हे प्रकरण अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रात आहे. राजनयिक सवलत देण्यामध्ये संयुक्त राष्ट्राची तशी कोणतीही भूमिका नाही; पण मुख्यालयाशी संबंधित करारान्वये अमेरिका अशी सवलत देते. यापूर्वी देवयानी खोब्रागडे अमेरिकेतील भारताच्या उप वाणिज्य दूत होत्या. व्हिसाप्रकरणी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अमेरिकी पोलिसांनी अटक केली होती. नंतर अडीच लाख डॉलरच्या (सुमारे दीड कोटी रुपये) जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली होती. भारताने देवयानी प्रकरणात खटल्याच्या आधीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यापासून सूट मागितली आहे. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे.