आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Doing Dinner Diplomacy For Leading SAARC Country, Divya Marathi

सार्क देशांच्या नेतृत्वासाठी भारताची डिनर डिप्लोमसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या सार्क देशांच्या नेत्यांची खास खातिरदारी करून भारताने या देशांचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सार्क देशांचे नेते आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी ‘खासगी रात्रभोजन’ आयोजित केले असून त्यात अतिथींना गुजरातपासून तामिळनाडूपर्यंतच्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदीही या नेत्यांना भेटणार आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपाक्षे, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई, भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आणि मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम हे मोदींच्या शपथविधी समारंभामध्ये सहभागी होणारे प्रमुख नेते आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या वतीने तेथील लोकसभा अध्यक्ष शिरीन चौधरी प्रतिनिधित्व करत आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभानंतर पाहुण्यांना गुजराती ढोकळासह सहा प्रकारचे नमकीन देण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांना ‘पान’खाऊ घालून राष्ट्रपती भवनातून निरोप दिला जाणार आहे.

गुजराती ‘केला मेथी नू शाक’आणि तामिळनाडूचा ‘चिकन चेट्टीनाद’
राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या रात्रभोजनात परदेशी पाहुण्यांना गुजरातची ‘केला मेथी नू शाक’, तामिळनाडूचा ‘चिकन चेट्टीनाद’, पंजाबची ‘दाल मखनी’आणि बंगालच्या ‘पौटेल दोरमा’सारखे अस्सल भारतीय व्यंजनाची चव चाखायला मिळणार आहे.

मोदींनी दिले आधीच संकेत
शपथविधी समारंभासाठी सार्क देशांच्या नेत्यांना निमंत्रित करून जगाकडे पाहण्याआधी आशिया खंडात भारताने गमावलेली प्रतिष्ठा भारत पुन्हा मिळवू इच्छितो, असे स्पष्ट संकेत मोदींनी दिली आहेत.

प्रतिसादाचा अभाव
बांगलादेशासोबतचा तिस्टा वाद सोडवण्याला मोदी सरकार प्राधान्य देईल, असे जाणकारांचे मत आहे. नेपाळ आणि भूतानही काही मुद्यांच्या बाबतीत भारताकडे पाहत आहे. श्रीलंकेच्या महिंदा राजपाक्षे यांनी नेहमीच भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर जोर दिला आहे मात्र भारताकडून त्यांना योग्य प्रतिसाद मिळालेला नाही.
उद्या द्विपक्षीय चर्चेची मोहीम
सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी 10 वाजेपासूनच सार्क देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या आठही देशांचे नेते राष्ट्रपतींनाही भेटणार आहेत. या चर्चेदरम्यान भारत या देशांचे भारताकडे नेतृत्व घेण्याची चाचणी करण्याची शक्यता आहे.

शरीफांशी पहिली भेट
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना मायदेशी परतण्याची घाई असल्यास सर्वात आधी नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा करतील तसे नसेल तर अफगाणिस्तान आणि मालदीवच्या अध्यक्षांशी चर्चा झाल्यानंतर त्यांची चर्चा होईल.

बंद दाराआड चर्चा
द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांचे प्रमुख आणि त्यांच्यासोबत प्रत्येकी 3 अधिकारी असे या चर्चेचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. माध्यमांना या चर्चेचे कव्हरेज करण्याची संधी नाही. प्रश्नोत्तरेही होणार नाहीत आणि संयुक्त निवेदनही जारी केले जाणार नाही.

दुर्लक्षामुळे चीनचा हस्तक्षेप
सात सार्क देशांकडे भारताने दुर्लक्ष केल्यामुळे या देशातील व्यापार, विकास आणि संरक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करण्याची संधी चीनला मिळाली आहे.