नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांच्या भारत दौऱ्याचे सर्वात मोठे फलित शुक्रवारी झालेल्या नागरी अणुकराराच्या रूपाने दिसून आले. या करारान्वये ऑस्ट्रेलिया भारताला वीज उत्पादनासाठी समृद्ध युरेनियमचा पुरवठा करणार आहे.
दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान
नरेंद्र मोदी व अॅबॉट यांच्या उपस्थितीत हा करार झाला. तत्पूर्वी, या युरेनियमचा उपयोग फक्त शांततापूर्ण कामांसाठीच केला जाईल, असे आश्वासन भारताने दिल्याचे अॅबॉट म्हणाले. भारताला युरेनियम विक्री न करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने काही वर्षांपूर्वी घेतलेला होता. २००८ मध्ये भारत-अमेरिकेदरम्यान झालेल्या नागरी अणुकरारानंतर ऑस्ट्रेलियाने ही बंदी उठवली होती.
ऑस्ट्रेलियाकडे जगातील सुमारे ४० टक्के युरोनियमचे साठे आहेत. भारताने अण्वस्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियम मिळत नव्हते. समृद्ध युरेनियममुळे अणुवीजच नव्हे तर अण्वस्रांचीही निर्मिती केली जाऊ शकते.
वीज निर्मिती वाढणार
भारतात वीज उत्पादनासाठी बहुतांशी कोळशाचा वापर होतो. युरेनियमद्वारे केवळ दोनच टक्के वीजनिर्मिती होते. ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम मिळाल्यामुळे भारतातील अणुविजनिर्मिती प्रकल्पांत अधिक विजेचे उत्पादन होऊ शकेल.
पुढील स्लाइडमध्ये, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अमर जवान ज्योती येथे...