आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य तेच निवडा! विदर्भातील 10 जागांसह देशात 91 ठिकाणी आज मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात आजवर मतदानाचे दोन टप्पे पार पडले. त्यात फक्त 11 जागांसाठी मतदान झाले. परंतु गुरुवारी होणार्‍या तिसर्‍या टप्प्यात 11 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांतील 91 जागांवर मतदान आहे. देशात 11 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. राज्यातील पहिला टप्पाही गुरुवारीच असून, विदर्भातील 10 जागांच्या मतदानाने निवडणुकीचा श्रीगणेशा होत आहे. विदर्भाच्या 10 जागांवरील 201 उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राज्याचे दोन विद्यमान मंत्री शिवाजीराव मोघे आणि संजय देवतळे, तर माजी मंत्री विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक तसेच आठ विद्यमान खासदार रिंगणात आहेत. याशिवाय भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरीही नागपुरात लढत आहेत. विदर्भातील सुमारे 1 कोटी 65 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आज होणार येथे मतदान
राज्य जागा
केरळ 20
महाराष्ट्र 10
हरियाणा 10
उत्तरप्रदेश 10
ओडिशा 10
मध्यप्रदेश 9
दिल्ली 7
बिहार 6
झारखंड 4
जम्मू - काश्मीर 1
छत्तीसगड 1
लक्षद्वीप 1
चंदिगड 1
अंदमान निकोबार 1