आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला 22 गार्डियन ड्रोन देणार अमेरिका, पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी देण्यात आली मंजूरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताला 22 गार्जियन ड्रोन देण्यास अमेरिकेने मंजूरी दिली आहे. - Divya Marathi
भारताला 22 गार्जियन ड्रोन देण्यास अमेरिकेने मंजूरी दिली आहे.
नवी दिल्ली/ वॉशिग्टन- भारताला 22 गार्डियन ड्रोन देण्यास अमेरिकेने मंजूरी दिली आहे. या ड्रोनमुळे भारताला आपल्या 7500 किलोमीटर किनारपट्टीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 जून रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी अमेरिकेने ही मंजूरी दिली आहे. हा सौदा तीन अब्ज डॉलरचा असून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही बाब भारत सरकारला आणि उत्पादकांना कळविली आहे.
 
 
संरक्षण सहकार्य मजबुत करण्यावर जोर
अमेरिकेने ​भारताबरोबर संरक्षण क्षेत्रातील सहकार्य मजबुत करण्याच्या दिशेने टाकलेले हे ठोस पाऊल असल्याचे मानण्यात येत आहे.
- ओबामा यांच्या काळात भारत-अमेरिकेतील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य मजबुत होते. ट्रम्प यांच्या काळात ते काहीसे कमजोर झाल्याचे मानण्यात येत होते. उत्तर कोरियाच्या विरोधात अमेरिकेने चीनचेही सहकार्य मागितले आहे. 
- चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी जपान, व्हिएतनाम आणि ब्रिटनच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ट्रम्प यांच्या प्राथमिकतेत भारताला स्थान नसल्याचे म्हटले जात होते.
पहिल्यादाच घडत आहे असे
-​ बिगर नाटो देशासोबत अमेरिका पहिल्यादाच असा करार करत आहे. 
- अमेरिकेने नुकतेच भारताला महत्वपुर्ण देश असल्याचे म्हटले होते. भारत हा अमेरिकेचा मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
 
 
बातम्या आणखी आहेत...