आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Faces Severe Ammunition Shortage Can Fight War For Only 20 Days Cag

लष्कराकडे फक्त 10 दिवस पुरेल एवढाच दारु-गोळा, CAGचे ताशेरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या दारु-गोळा विभागावर कॅगने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालानूसार, लष्कराकडे दारु-गोळ्यांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे अचानक युद्ध परिस्थिती उद्भवली तर भारताचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.
भारतीय लष्कराकडे कमीत कमी 40 दिवस पुरेल एवढा दारु-गोळा असणे गरजे होते, मात्र मार्च 2013 मध्ये जेव्हा पाहाणी करण्यात आली तेव्हा फक्त 10 दिवस पुरेल एवढीच युद्ध सामग्री असल्याचे उघड झाले होते. जर सलग 20 ते 30 दिवस लढण्याची वेळ आली तर भारतीय लष्कर त्या परिस्थितीचा सामना करु शकणार नाही. यावरुन कॅगने संरक्षण मंत्रालयावर ताशेरे ओढले आहेत.

कॅगचे ताशेरे - लढाऊ विमान तेजस वायुदलाच्या आपेक्षांपुढे अपयशी
नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालानुसार, लढाऊ विमाने तेजस भारतीय वायुदलाच्या आपेक्षेवर खरे उतरलेले नाहीत. त्यातील मार्क -1 व्हर्जनमध्ये 53 दोष आहेत. त्याचा परिणाम संचालन आणि देखभालीवर पडत आहे. वायुदलाकडे प्रशिक्षणासाठी विमान नाहीत, त्यामुळे प्रशिक्षणावर परिणाम होत आहे.