आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India GDP Grows At 5.7% In June Quarter, Beats America

भारताच्या आर्थिक विकासाचा वेग अमेरिकेहून अधिक, GDP अडीच वर्षातील सर्वोत्तम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली - अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एक चांगली बातमी आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल - जूनच्या तिमाहीत भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GDP चा विकासदर 5.7 टक्क्यावर होता. हा गेल्या 2.5 वर्षातील जीडीपीचा उच्चांक आहे. विशेष म्हणजे एका दिवसापूर्वीच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित ताजी आकडेवारी जाहीर झाली. त्यानुसार अमेरिकेचा GDP गेल्या तिमाहीत 4.2 टक्के एवढाच होता. म्हणजे सध्या तरी भारताचा विकासदर अमेरिकेच्या तुलनेत अधिक आहे.
जानेवारी-मार्चच्या तिमाहीमध्ये भारताच्या GPD वाढीचे प्रमाण 4.6 टक्के आणि एका वर्षापूर्वी एप्रिल - जूनच्या तिमाहीत 4.7 टक्के होते. केंद्रीय सांख्यिकी संघटना (सीएसओ) ने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार या काळात उत्पादन क्षेत्रात 3.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षी याच काळात या क्षेत्रात 1.2 टक्के घट नोंदवण्यात आली होती. त्याचप्रमाणे एप्रिल - जून 2014 या तिमाहीमध्ये मायनिंग सेक्टरमध्ये 2.1 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तर गेल्या वर्षी याच काळात 3.9 टक्क्यांची घट होती.

मोदी इफेक्‍ट?
अनेक लोक याला नरेंद्र मोदी सरकारचे यश मानत आहेत. पण तज्ज्ञांच्या मते असे म्हणणे घाईचे ठरेल. त्याचे कारण म्हणजे ही आकडेवारी एप्रिल ते जून या दरम्यानची आहे. मोदींनी 26 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पण एप्रिल 2014 च्या सुरुवातीलाच मोदी सरकार येणार असे संकेत बाजारात दिसू लागले होते, हेही नाकारता येणार नाही. तसेच मोदींची सत्ता आल्यास उद्योगक्षेत्रासाठी 'अच्छे दिन' येणार याचेही संकेत आधीच मिळाले होते. काही तज्ज्ञांच्या मते या सर्व मुद्यांचाही काही प्रमाणात परिणाम झालेला असणार आहे.