आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी आई सुषमांना म्हणाली - माझ्या बाळाला सीमा कळत नाही! काही तासांत मिळाला व्हिसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी एका आजारी बाळाला तातडीने मेडिकल व्हिसा दिला आहे. सोमवारी पहाटे ह्रदयरोगाने पीडित पाकिस्तानी बाळाच्या आईने सुषमा स्वराज यांना ट्विट केले होते. त्यात म्हटले होते, की माझ्या मुलाला उपचारांची गरज आहे, त्याने त्रास का सहन करावा? माझी विनंती आहे की आम्हाला तत्काळ मेडिकल व्हिसा मिळावा. त्यावर सुषमा स्वराज यांनी बाळावर भारतात उपचार होतील, असा विश्वास देणारे ट्विट मंगळवारी केले होते. 
 
पाकिस्तानमधील रोहान या बाळावर भारतात उपचार व्हावे, आणि त्यासाठी त्याला मेडिकल व्हिसा मिळाव अशी विनंती करणारे ट्विट बाळाची आई मेहविश मुख्तार हिने केले होते. त्याला भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी उत्तर दिले होते. त्या म्हणाल्या, 'बाळावर भारतात उपचार व्हावे यासाठी आम्ही मेडिकल व्हिसा देऊ.' सुषमा यांच्या ट्विटनंतर काही तासांत इस्लामाबाद इंडियन हाय कमिशनने व्हिसा जारी केल्याची माहिती ट्विटरवर दिली होती. 
 
आजारी बाळाला बॉर्डर कळत नाही - आई
- आजारी बाळाची आई मेहविश मुख्तार यांनी सुषमा स्वराज यांना ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की बाळाच्या उपचारांसाठी सीमा आडवी येऊ शकत नाही. मेहविश यांनी लिहेले होते, 'मानवतेसाठी सीमा अडथळा कशा ठरतात? माझ्या बाळाला अजून सीमा कळत नाही.'
बातम्या आणखी आहेत...