आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थमंत्री अरुण जेटलींचा गव्हर्नर राजन यांच्यावर पलटवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे ‘आंधळ्यांच्या राज्यात हेकणा राजा’ असे मत व्यक्त करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका प्रकारे उत्तर दिले आहे. त्यांच्या वक्तव्यावर पलटवार करत वास्तवात भारतीय अर्थव्यवस्था सर्वात जलद गतीने विकसित होत असल्याचे सांगितले आहे. जगभरातील इतर मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था तेजीने विकसित होत असल्याचा दावा त्यांनी केला.

इतर कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांनी विकास करत असती तर तो देश आनंदाने नाचत असता असे मत जेटली यांनी व्यक्त केले. मात्र, भारताचा विकास दर पाहताना आम्ही स्वस्त बसू शकत नाही. कारण आमच्याकडे यापेक्षा जास्त विकास दर साध्य करण्याची क्षमता असल्याचे जेटली म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला ‘आंधळ्यांच्या राज्यात हेकण्या राजा’ची उपमा दिली होती. त्या संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली बोलत होते.
मान्सूनकडून आशा
इतर जगभरातील देशांच्या तुलनेत आमचा विकास दर तेजीने वाढत असून ही वाढ वास्तविक असल्याचे जेटली यांनी सांगितले. आपल्याला वाटत असलेल्या अपेक्षेपेक्षा आपण चांगली प्रगती करू शकत असल्याचे ते म्हणाले. मान्सून आणि रिफॉर्म्स चांगला राहिल्यास आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी सुधारण्याची आशा असल्याचे मतही जेटली यांनी व्यक्त केले.
जीएसटी मंजुरीची आशा
अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लवकरच मंजूर होण्याची आपल्याला अाशा असल्याचे सांगितले आहे. राज्यांच्या निवडणुकीत संसदेतील संख्येत बदल झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जीएसटी लवकरच मंजूर होईल, अशी अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली.