आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Had Broken Into Pakistan And Army Reached Lahore

आजच्‍याच दिवशी भारतीय सैन्‍याने लाहोरमध्‍ये फडकावला होता तिरंगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतासाठी आजचा दिवस अर्थात 6 सप्‍टेंबरला एक अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात 1965 मध्‍ये झालेल्‍या युद्धात भारतीय सैन्‍याने पाकिस्‍तानात घुसून लाहोर आणि सियालकोटपर्यंत धडक दिली होती. तो दिवस होता 6 सप्‍टेंबर 1965. पाकिस्‍तानने ऑपरेशन जिब्राल्‍टर आखून जम्‍मू आणि काश्मिरमध्‍ये घुसण्‍याचा प्रयत्‍न केला होता. परंतु, भारताने तोडीस तोड उत्तर देऊन पाकिस्‍तानला जेरीस आणले.

भारताने थेट कराचीपर्यंत धडक दिली. याचा मूळ हेतू पाकिस्‍तानच्‍या घूसखोरीला प्रत्‍युत्तर देण्‍याचा होता. हे युद्ध 5 आठवडे चालले. दोन्‍ही बाजुंचे हजारो जण मारल्‍या गेले. काश्मिरातील चाल मोडून काढण्‍यासाठी भारतीय 6 सप्‍टेंबर 1965 ला सैन्‍य लाहोरमध्‍ये घुसले. आंतरराष्‍ट्रीय सीमा पार करण्‍याचा धाडसी निर्णय भारताने घेतला होता. पाकिस्‍तानने याचा स्‍वप्‍नातही विचार केला नव्‍हता. संयुक्त राष्‍ट्रांनी केलेल्‍या आवाहनावरुन भारत-पाकिस्‍तान प्रथमच युद्धबंदीसाठी तयार झाले. भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्‍त्री आणि पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती अयुब खान यांनी जानेवारी 1966 मध्‍ये ऐतिहासिक ताश्‍कंद करारावर स्‍वाक्षरी केली होती. हा करार केल्‍यानंतर दुस-याच दिवशी शास्‍त्रीजींचा संशयास्‍पद मृत्‍यू झाला होता.

या युद्धाची सुरुवात आणि ताश्‍कंद करारापर्यंतची कहाणी... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...