आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक व राजकीय असमानता वाढल्याने जेंडर गॅप निर्देशांकात भारत 21 स्थानांनी घसरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जेंडर गॅप इंडेक्समध्ये (लिंगभेद निर्देशांक) भारताची २१ स्थानांनी घसरण झाली आहे. फोरमने १४४ देशांच्या यादीत भारताला १०८ वे स्थान दिले आहे. गतवर्षी भारत ८७ व्या स्थानी होता. स्त्री-पुरुषांत आर्थिक व राजकीय असमानतेतील वाढ त्यामागील प्रमुख कारण आहे. फोरमकडून चार निकषांवर मानांकन देण्यात येते. पैकी दोनमध्ये केवळ एक-एक अंकाने परिस्थिती सुधारली आहे. उर्वरित दोन निकषांत मात्र बिघडली आहे. राजकीय अधिकारांत भारत १५ व्या स्थानी आहे. इतर तीन निकष- आर्थिक सहभागित्व, शिक्षण व अारोग्यात रँकिंग १०० पेक्षा खाली आहे. 

जेंडर गॅपच्या रँकिंगच्या ११ वर्षांच्या इतिहासात प्रथमच जागतिक पातळीवरही स्त्री-पुरुषांतील असमानता वाढली आहे. २०१६ च्या अहवालात म्हटले होते की, ही दरी मिटवण्यासाठी ८३ वर्षे लागतील. मात्र नव्या अहवालानुसार त्यासाठी आता १०० वर्षे लागतील. वेतनातील अंतर मिटवण्यासाठी तर तब्बल २१७ वर्षे लागतील. राजकीय अंतर दूर करण्यासाठी ९९ वर्षे आणि शैक्षणिक असमानता दूर करण्यास १३ वर्षे लागतील.  

सलग नवव्या वर्षी आइसलँड प्रथम
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जेंडर गॅप इंडेक्स यादीत सलग नवव्या वर्षी आइसलँड प्रथम स्थानी आहे. यानंतर नॉर्वे, फिनलँड, रवांडा, स्वीडन, निकारागुवा, स्लोव्हेनिया, आयर्लंड, न्यूझीलंड व फिलिपिन्सचा समावेश आहे. 

दोन निकषांवर कामगिरी सुधारली, उर्वरित दोन मध्येही फक्त एकेका अंकाचे अंतर
-  आर्थिक : महिलांना ६६% कामाचे पैसेच मिळत नाहीत : भारत १३९ व्या स्थानी आहे. भारतात महिला दररोज सरासरी ५३७ मिनिटे  तर पुरुष ४४२ मिनिटे काम करतात. असे असूनही महिलांना ६६% कामाचे पैसेच मिळत नाहीत. पुरुषांसाठी हे प्रमाण १२% आहे. महिलांचा सरासरी पगार ५,४०० व पुरुषांचा ८,१०० रुपये आहे. 
-  आरोग्य : केवळ तीन देश मागे भारतापेक्षा : भारताची रँकिंग १४१ आहे. म्हणजेच परिस्थिती अत्यंत वाईट आहे. भारताच्या खाली अझरबैजान, आर्मेनिया आणि चीन हे तीनच देश आहेत. भारतात ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या १ लाख मुलींपैकी ५९५ जणांचा मृत्यू होतो. संक्रामक रोगांनी मृत होणाऱ्यांची सरासरी प्रतिलाख ५८७ आहे. 
-  राजकीय : संसदेत प्रतिनिधित्वात ११८ व्या स्थानी : भारतीय महिला भले १५ व्या स्थानी असल्या तरी अंतर वाढले आहे. संसदेत प्रतिनिधित्वाबाबत ११८ वे आणि मंत्रिपदांबाबत ७६ व्या स्थानी आहेत. भारतात १९६६ मध्ये प्रथमच महिलेस पंतप्रधानपद मिळाले होते. 
-  शिक्षण : प्राथमिक-माध्यमिक शिक्षण नोंदणीत प्रथम स्थानी : रँकिंग भले ११२ वे असले तरी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भरतीत भारत नंबर १ वर आहे. येथील ४०.३% प्रौढ महिल प्राथमिक शिक्षण झालेल्या आहेत. पुरुषांचे प्रमाण ६२% आहे.
बातम्या आणखी आहेत...