आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या तिजोरीत ५५७ टन एवढे सोने, जगातील पहिल्या दहा देशांत दहावे स्थान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे सोनेरी दिवस आता दूर नाहीत, असे म्हटले तर खोटे वाटायला नको. कारण, भारताकडे असलेला सोन्याचा साठा आता तब्बल ५५,७,७०० किलो (५५७.७ टन) झाला असून सर्वाधिक सोने बाळगणा-या देशांच्या यादीत भारत पहिल्या दहा देशांत समाविष्ट झाला आहे.

एखाद्या देशाकडे सोन्याचा साठा जितका अधिक तेवढा तो देश श्रीमंत आण सर्वार्थाने संपन्न मानला जातो. अशा देशांच्या यादीत भारतानेही आघाडी घेतल्याने एकेकाळी सोन्याची खाण मानल्या जाणारा भारत पुन्हा एकदा सुवर्णकाळाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत. जागतिक सुवर्ण परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत भारताचे स्थान दहावे असून अमेरिकेकडे सर्वांत मोठे म्हणजे ८१३३.५ टन एवढे सुवर्ण भांडार आहे. परकीय चलन साठ्यात याचे योगदान ७१ टक्के आहे. याशिवाय यादीत अनुक्रमे जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, चीन, स्वित्झर्लंड, जपान व नेदरलँड्स या देशांचा समावेश आहे.

नाणेनिधीकडून देखील पुष्टी
ऑक्टोबर २०१४ मध्ये सोन्याचा साठा दर्शवणारी आकडेवारी अद्ययावत करण्यात आली असली तरी जागतिक नाणेनिधी व जागतिक वित्तीय सांख्यिकीच्या आकडेवारीचाही यात आधार घेण्यात आला आहे. ही आकडेवारी साधारणपणे ऑगस्ट २०१४ मधील आहे.

महाशक्तींच्या पंक्तीत भारत
सोन्याचा साठा बाळगणा-या देशांच्या यादीत पहिल्या दहामध्ये भारत वगळता उर्वरित सर्व विकसित व आर्थिक महासत्ता म्हणून ओळखले जाणारे देश आहे. भारत एकमेव विकसनशील देश या यादीत समाविष्ट आहे.

पाकिस्तानकडे ६४ टन सोने
भारताच्या तुलनेत शेजारी देशांमध्ये सोन्याचा साठा खूपच कमी आहे. पाकिस्तानकडे ६४५ टन, नेपाळ ३६.३, श्रीलंका २२.१, मॉरिशस ३.९ तर म्यान्मारकडे ३.९ टन सोन्याचा साठा आहे. जगात सर्वाधिक सोने अमेरिकेकडे असून जर्मनी दुस-या स्थानावर आहे. इटली, फ्रान्स, रशियाचा त्यानंतर नंबर लागतो. चीनकडे भारतापेक्षा अधिक सोने आहे.