आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील टॉप 20 शैक्षणिक संस्थांतभारताच्या एकाही संस्थेचा समावेश नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील टॉप २० शैक्षणिक संस्थांत या वर्षी भारताच्या एकाही संस्थेचा समावेश नाही. जगातील पहिल्या १००० संस्थांतील भारतीय संस्थांची संख्याही ३१ वरून ३० वर घसरली आहे, असे एका नव्या अभ्यासात म्हटले आहे.  

टाइम्स हायर एज्युकेशनचे (टीएचई) जागतिक रँकिंग जाहीर करण्यात आले. त्यानुसार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ गेल्या वर्षी २०१ ते २५० या बँडमध्ये होते, ते या वर्षी २५१-३०० या बँडमध्ये गेले आहे. संशोधनाच्या प्रभावाची व्याप्ती आणि संशोधनातून मिळवलेले उत्पन्न यात घसरण झाल्याने रँकिंग घसरले आहे. दिल्ली, कानपूर आणि चेन्नई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज या संस्थाच्या बँडमध्येही एकने घसरण झाली आहे.  टीएचईच्या जागतिक रँकिंगचे संपादकीय संचालक फिल बॅटी म्हणाले की, वाढत्या जागतिक स्पर्धेत जागतिक संस्थांच्या श्रेणीमध्ये भारताची घसरण होत आहे हे निराशाजनक आहे. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूर यांसारख्या आशियाई देशांतील प्रमुख विद्यापीठांचे रँकिंग निधी पुरवल्यामुळे वाढत असताना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या भारतातील प्रमुख संस्थेला पहिल्या २०० विद्यापीठांत स्थान मिळत नाही हे निराशाजनक आहे. असे असले तरी भारताचे संशोधनाद्वारे मिळवलेले एकूण उत्पन्न आणि संशोधनाची गुणवत्ता मात्र वाढली आहे, ही सकारात्मक बातमी आहे. भारतातील जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचा आराखडा पाहता, उच्च शिक्षणात जास्त गुंतवणूक करण्याचे महत्त्व आता लक्षात आले आहे.
 
असे आहे भारतीय शिक्षण संस्थांचे रँकिंग  
सर्वात जास्त रँकिंग मिळालेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस २५१ ते ३०० च्या बँडमध्ये आहे, तर आयआयटी मुंबईने ३५१ ते ४०० या बँडमधील आपले स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ आयआयटी दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि रुरकी या संस्था ५०१ ते ६०० या बँडमध्ये आहेत. 
बातम्या आणखी आहेत...