आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताची विज्ञान क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाने झेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगभरातील अनेक देशांमधून वैज्ञानिक विकास, उच्च दर्जाचे वैज्ञानिक संशोधन आणि वाढीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, ्से असे एका अहवालानुसार समोर आले आहे. या क्षेत्रात पहिला क्रमांक चीनचा आहे.
या अहवालानुसार जगभरातील आघाडीच्या १०० संशोधन संस्थांमध्ये भारताच्या कौन्सिल फॉर सायंटिफिक अंड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटीज) या सर्व संशोधन संस्थांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भारताला हा गौरव प्राप्त होऊ शकला.
साधारणत: १०० मधील ४० संशोधन संस्थांतील उच्च दर्जाच्या कामगिरीमुळे चीनच आघाडीवर आहे. त्यातील २४ संस्थांत उत्तम विकास संशोधन असल्याचे म्हटले आहे. रायझिंग स्टारच्या अहवालावरून भारतही या दिशेने उत्तम प्रयोग करत आहे. तरुण शास्त्रज्ञ आणि तरुण या दिशेने जात आहेत. भारताने आणखी गंभीरपणे विज्ञान घ्यावे, असेही यात म्हटले आहे.
चिनी कामगिरी सरस
चिनीसंशोधन शैक्षणिक संस्था वेगाने प्रगती करत आहेत आणि त्या जगात प्रथम क्रमांक मिळवून क्रमवारीत आघाडी घेत आहेत. उच्च दर्जाचे संशोधन तसेच विकास याबाबतीत चिनी संशोधन संस्था पुढे असल्या तरी नेचर इंडेक्स २०१६ च्या रायझिंग स्टारचा अहवाल चीनच नं.१ वर असल्याचे सांगतो.
बातम्या आणखी आहेत...