आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Is An Indian Classic \'plan Should : PM Modi

मन की बात :\'एक भारत श्रेष्ठ भारत\' योजना हवी, मोदींनी केली इच्छा व्यक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाढत्या असहिष्णुतेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाची एकात्मता, सौहार्दता बळकट करण्यासाठी "एक भारत श्रेष्ठ भारत' योजना लागू करण्याची इच्छा व्यक्त केली. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी याविषयी नागरिकांकडून सूचना मागितल्या आहेत.

अंतर्गत सतर्कता देशाचे भांडवल असल्याचे मोदी यांनी सांगितले. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी मोदी यांनी एक भारत, श्रेष्ठ भारत मुद्द्यावर चर्चा केली होती. याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी संबंधित योजनेला मूर्त स्वरूप देण्याची इच्छा व्यक्त केली. सरकारच्या MyGov.com पोर्टलवर सूचना देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या योजनेचा आराखडा आणि लोकांचा सहभाग वाढवण्यासाठीचे उपाय सुचविण्याची मुख्य अपेक्षा करण्यात आली आहे. कार्यक्षम योजना अस्तित्वात येण्यासाठी नागरिकांनी सर्जनशील कल्पना मांडाव्यात. यामध्ये सरकार, समाज आणि नागरिकांच्या योगदानाचे स्वरूप काय असेल, अशी विचारणा पंतप्रधानांनी देशवासीयांकडे केली आहे.

प्रत्येकजण सहज जोडले जाऊ : एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेत प्रत्येक माणूस सहजासहजी जोडला पाहिजे, असे मोदी म्हणाले. असहिष्णुतेच्या वादंगात देशाच्या सांस्कृतिक, एकात्मिक आणि सौहार्दपूर्ण वातावरणाला बळकटी देण्यासाठी मोदी यांनी संबंधित योजनेचा प्रस्ताव ठेवल्याचे मानले जाते. देशात असहिष्णुता वाढत असून सरकार त्यावर काहीच करत नसल्याचा काहींचा आक्षेप आहे.

अवयवदानासाठी पुढे या :
पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात नागरिकांना अवयव दानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. याशिवाय त्यांनी शारीरिक दुर्बलतेवर मात करत लोक कसा आदर्श प्रस्थापित करतात याचे उदाहरण दिले. १९९६ मध्ये अतिरेक्यांच्या गोळीबारात काश्मीरमधील जावेद अख्तर यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्वत:च्या पायावरही उभे राहता येत नव्हते. या निरपराध व्यक्तीला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. मात्र, सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्यावरील संकटाचे संधीत रूपांतर केले. ते गेल्या २० वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. त्यांनी लहान मुलांना शिकवण्याचा वसा घेतला. याशिवाय सार्वजनिक स्थळावर, सरकारी इमारतीमध्ये अपंगांसाठीच्या सुविधेत कशा सुधारणा करता येतील यावर ते काम करत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइडवर वाचा वातावरण बदलाविरुद्धचा लढा एकत्रित जबाबदारी :