नवी दिल्ली - पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी काश्मिरला पाकिस्तानच्या 'गळ्यातील नस' म्हटले. यावरुन काँग्रेसने जोरदार हल्ला केला. काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी म्हणाले, 'जर पाकिस्तान काश्मिरला गळ्याची नस समजत असेल तर, त्यांनी याची जाणीव ठेवावी की आमच्यात ती कापण्याची ताकद आहे.'
काश्मिरला पाकिस्तानच्या गळ्याची नस म्हणणा-या जनरल शरीफ यांनी म्हटले होते, की काश्मिर प्रश्नाचे समाधान तेथील लोक भावना आणि संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसारच झाले पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हटले होते जनरल शरीफ