आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Is Nepal's 'elder Brother', Not 'big Brother': Sushma Swaraj

भारत नेपाळचा मोठा भाऊ : सुषमा स्वराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काही लोकांच्या मते, भारत नेपाळसोबत "बिग ब्रदर'प्रमाणे वागतो. परंतु ‘बिग ब्रदर’ ही पाश्चिमात्यांची अवधारणा आहे. भारत नेपाळच्या ज्येष्ठ बंधूच्या भूमिकेत आहे आणि सदैव राहीन. ज्येष्ठ बंधू या नात्याने नेपाळच्या कल्याणासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताची नेपाळबद्दलची भूमिका सोमवारी व्यक्त केली. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा सध्या भारत दौऱ्यावर आले असून रविवारी त्यांनी भारतीय वैश्विक संबंध परिषदेच्या २१ व्या सप्रू हाऊस व्याख्यानमालेत विचार मांडले.

याचे अध्यक्षस्थान स्वराज यांनी भूषवले. या वेळी शर्मा म्हणाले, नेपाळ चीन किंवा भारत यापैकी कोणताच पत्ता खेळत नाही. दोन्ही देशांचा आम्ही समान सन्मान करतो. एका देशाच्या तुलनेत दुसऱ्याला अधिक महत्त्व देणे नेपाळच्या परराष्ट्र धोरणात नाही, परंतु भारताशी व्यावसायिक तसेच अन्य संबंध दृढ करण्याला नेपाळचे प्राधान्य असेल. दरम्यान, नेपाळच्या भूमीचा भारताविराेधात उपयाेग हाेऊ देणार नाही, असे शर्मा म्हणाले.

नवी राज्यघटना निर्मिती वेदनादायी : थापा
नव्या राज्यघटनेची निर्मिती नेपाळसाठी खूपच वेदनादायी ठरली. त्यामुळे भारतीय नेते आणि माध्यमांमध्ये गैरसमज पसरला, अशी भावना नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी व्यक्त केली आहे. नव्या राज्यघटनेत पक्षांचे सिद्धांत सामील करण्यात आले नसल्यामुळे आमच्या पक्षाने त्याविरोधात मतदान केले होते. परंतु संविधान सभेने ८६ टक्के मतांनी राज्यघटनेला मंजुरी दिल्यामुळे आम्ही त्याचा सन्मान केला आणि राज्यघटना स्वीकारली, असेही ते म्हणाले.