आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगतसिंग तत्कालीन कन्हैयाकुमारच होते, शशी थरूर यांच्या वक्तव्याने नवे वादंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारची तुलना भगतसिंग यांच्याशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपने हा भगतसिंगांचा अपमान असल्याची टीका केली आहे. काँग्रेसने मात्र यापासून हात झटकले आहेत.
जेएनयूत रविवारी रात्री विद्यार्थ्यांना संबोधित करताना थरूर म्हणाले, ब्रिटिश राजवटीत नेहरू, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, अॅनी बेझंट आणि भगतसिंग यांच्यावर देशद्रोहाचे खटले होते.
दरम्यान, एका मुलीने कन्हैयाचा उल्लेख केला. त्यावर थरूर म्हणाले, भगतसिंग त्या काळचे कन्हैयाकुमार होते. वादानंतर थरूर यांनी स्पष्टीकरण दिले की, मी एका मुलीच्या टिप्पणीवर उत्तर दिले होते. स्थळकाळ वेगळे असले तरी त्यांची तुलना युवा, मार्क्सवादी, आदर्शवादी, ध्येयनिष्ठ व मातृभूमीसाठी कटिबद्धतेनुसार होऊच शकते.

हा भगतसिंगांचा अपमान : भाजप
भाजप नेते शाहनवाझ हुसेन म्हणाले, देशासाठी "भारतमाता की जय'च्या घोषणा देत भगतसिंह फासावर गेले. कन्हैया भगतसिंग असेल तर सोनिया गांधी कोण आहेत, याचे उत्तर थरुरांना द्यावेच लागेल. काँग्रेस नेते मीम अफझल म्हणाले, आजकालच्या मुलाशी भगतसिंगांची तुलना कदापि होऊ शकत नाही. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पण पक्षाशी त्याचे काही देणेघेणे नाही.
बातम्या आणखी आहेत...