आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवरील निर्भरतेत भारत जगात नंबर वन; 82% लोक म्हणाले, एक दिवसही शक्य नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंटरनेटविना आयुष्य जगता येऊ शकते का? हा प्रश्न घेऊन मार्केटिंग रिसर्च कंपनी इप्पोसने जगभरात सर्व्हे केला. सुमारे ७०% लोकांचे उत्तर होते, ‘हे महाकठीण काम आहे.’ विशेष म्हणजे इंटरनेट अवलंबनाबाबत भारत पहिल्या स्थानी आहे. ८२% भारतीया म्हणाले, इंटरनेटविना एकही दिवस काढता येणार नाही. दुसऱ्या स्थानी इंग्लंड, तृ़तीय स्थानी चीनचे नागरिक आहेत. अमेरिका, जपानसारख्या देशांचे इंटरनेटवरील अवलंबत्व भारतापेक्षा कमी आहे. इप्पोसने हा सर्व्हे २३ देशांतील २५-३५ वयोगटातील १८,१८० लाेकांमध्ये केला. दुसरीकडे, एका सर्व्हेनुसार २०१६ मध्ये जगात ३.५ अब्ज इंटरनेट युजर होते. म्हणजे ४५% लोकसंख्या नेट वापरते. पैकी २५-३५ वयोगटातील लोक दररोज १८५ मिनिटे मोबाइल इंटरनेटवर घालवतात. ३५-५५ वयोगटात हे प्रमाण ११० मिनिटे आहेत.

४९%भारतीय ऑनलाइन शॉपिंग करतात, वैश्विक सरासरी ३८%
भारतात ४९% इंटरनेट युजर्स ऑनलाइन शॉपिंग करतात. वैश्विक सरासरी केवळ ३८% आहे. भारतात २०१६ मध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांची ऑनलाइन शॉपिंग झाली. २०१६ मध्ये ग्लाेबल रिटेल ई-कॉमर्स ११९ लाख कोटी रुपयांचे होते.

भारतात ४६ कोटी, चीनमध्ये ७२.१ कोटी इंटरनेट युजर्स
इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येबाबत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. २०१६ मध्ये देशात ४६ कोटी नेट युजर्स तर चीनमध्ये ७२.१ कोटी होते. २०२१ पर्यंत भारतात हा आकडा ६४ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. गतवर्षी ३२.३ कोटी भारतीयांनी स्मार्टफोनवर इंटरनेट वापरले. यात सोशल साइट्सचा सर्वाधिक वापर झाला. २०१६ मध्ये २१.६५ काेटी सोशल नेटवर्क युजर होते. २०२१ मध्ये हा आकडा ३६ कोटींवर जाईल.
बातम्या आणखी आहेत...