आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय लष्कराने घेतला \'उरी\'चा बदला; पाकमध्ये घुसून 7 दहशतवादी तळ उध्वस्त, 38 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काश्मीरच्या उरी येथील भारतीय लष्‍कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 10 दिवस झाल्यानंतर भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. लष्कराने पहिल्यांदाच लाइन ऑफ कंट्रोल (LOC) ओलांडून पाक व्याप्त काश्मीरमध्ये (POK) घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उध्वस्त केले. या कारवाईत 38 दहशतवादी ठार मारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी पाकिस्तानी लष्करा 2 जवान ठार झाले तर 9 जखमी झाले. गेल्या 45 वर्षांत सहाव्यांदा भारतीय लष्कराने पाकिस्तानी सीमा ओलांडली आहे.

या कारवाईबाबत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी सांगितले
- लष्कराने बुधवारी चालवलेल्या सर्जिकल कमांडो स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांचे 7 ‍तळ उद्धवस्त केले. रात्रीच्या सुमारास 12.30 ते 4.30 पर्यंत ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला. दहशतवाद्यांच्या प्रत्येक तळावर 30-40 दहशतवादी होते.
- काल रात्री (बुधवारी) दहशतवादी LOC ओलांडून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी दहशतवादी तळांवर ते जमले होते. जम्मू-काश्मिर आणि भारतातील प्रमुख शहरांवर हल्ल्याची तयारी या दहशतवाद्यांनी केली होती.
- आम्हाला मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहशतवाद्यांचा खातमा करायचा हाच उद्देश आमचा होता.
- या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले. एलओसी पलीकडे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे ऑपरेशन आता समाप्त झाले आहे. आमचा उद्देश केवळ दहशतवाद्यांचा खातमा करणे होता.
- पुन्हा लगेच अशा स्वरुपाचे ऑपरेशन राबविण्याचा आमचा उद्देश नाही. पण पाकिस्तानकडून काही कारवाई झाल्यास त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
- पाकिस्तानच्या डीजीएमओंना या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांना भारतीय भूमिवर हल्ले करु देणार नाही. त्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील.
- जानेवारी 2004 मध्ये पाकिस्तानने आश्वासन दिले होते, की आमचा भूमिचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करु दिला जाणार नाही. पाकिस्तान आपले आश्वासन कायम ठेवेल अशी आशा आम्ही करतो.
सीमेलगच्‍या 4 राज्‍यांतील 10 किमीपर्यंतचा परिसर खाली
पाकिस्‍तान भारतावर प्रतिहल्‍ला करू शकतो, हे विचारात घेऊन पाकिस्‍तानच्‍या सीमेलगत असलेल्‍या चार राज्‍यांतील 10 किमीपर्यंत गावांना खाली करण्‍यात आले आहे. एवढेच नाही आर्मीच्‍या जवानांच्‍या सुट्या रद्द करण्‍यात आल्‍या.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली चार राज्‍यांच्‍या मुख्‍यमंत्र्यांसोबत चर्चा
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-कश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान या राज्‍यांच्‍या मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा केली. शिवाय चारही राज्‍यातील सीमेलगत हाय अलर्ट जारी केला.

दिल्‍लीत सर्वपक्षीय बैठक
पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारताने दहशतवादी तळावर कारवाई केली. या संदर्भात आज (गुरुवार) सायंकाळी तातडीने सर्व पक्षीय बैठक बोलावण्‍यात आली होती. बैठकीला पंतप्रधानासह मंत्री आणि सर्वच पक्षाचे प्रमुख नेते उपस्‍थ‍ित होते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या कारवाईबद्दल लष्‍कर आणि सरकारचे अभिनंदन केले. शिवाय आम्ही सरकारसोबत आहोत, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

दहशतवाद्यांचे डीएनए सॅम्पल पाकला पाठवले...
भारताने पाकच्या सीमेत जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार मारलेल्या अतिरेक्यांच्या मृतदेहाचे डीएनए सॅम्पल पुरावे म्हणून पाकिस्तानला पाठवल्याल्याचेही रणबीर सिंग यांनी सांगितले.
कसे करण्यात आले सर्जिकल स्ट्राइक
- भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोंनी एलओसी पार करुन ही कारवाई केली. यासाठी वायुदलाची कोणतीही मदत घेण्यात आली नाही. यात केवळ पॅराकमांडो सामिल होते. त्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सीमेवर सोडण्यात आले होते.
- 12.30 वाजता सुरु झालेले ऑपरेशन चार तास चालले. 7 दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. या दरम्यान कमांडो पाकिस्तानी सीमेत दोन किलोमीटर आत घुसले होते. त्यांनी 38 दहशतवादी ठार मारले.
- भिम्बेर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्टरमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने हल्ला केल्याचे पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस पब्लिश रिलेशनने मान्य केले आहे.
- कमांडो कारवाईला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे जवान पुढे आले. पण काऊंटर ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचे दोन जवान ठार झाले.
काय असते सर्जिकल स्ट्राइक
- सर्जिकल स्ट्राइक म्हणजे अतिशय गोपनिय पद्धतीने दुसऱ्या देशात घुसून लष्करी कारवाई करणे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये असे ऑपरेशन राबवले होते. तसेच भारतानेही यापूर्वी म्यानमारमध्ये असे ऑपरेशन राबवून दहशतवादी तळ उध्वस्त केले होते.
वाघा बॉर्डरवर आज होणार नाही परेड
या कारवाईमुळे दोन्‍ही देशांत तणाव निर्माण झाला असून, वाघा बॉर्डरवर रोज होणारी परेड आजची परेड रद्द करण्‍यात आली.
पुढील स्लाइडवर वाचा, आम्ही दुबळे, असे समजू नका- नवाझ शरीफ... काय आहे सर्जिकल स्ट्राइक? आणि पाहा रणवीर सिंग यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...