नवी दिल्ली- काश्मीरच्या उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 10 दिवस झाल्यानंतर भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. लष्कराने पहिल्यांदाच लाइन ऑफ कंट्रोल (LOC) ओलांडून पाक व्याप्त काश्मीरमध्ये (POK) घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उध्वस्त केले. या कारवाईत 38 दहशतवादी ठार मारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी पाकिस्तानी लष्करा 2 जवान ठार झाले तर 9 जखमी झाले. गेल्या 45 वर्षांत सहाव्यांदा भारतीय लष्कराने पाकिस्तानी सीमा ओलांडली आहे. भारताकडून झालेल्या या कारवाईचे सर्वच राजकीय पक्षांकडून कौतुक करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही विविध विविध प्रतिक्रीया व्हायरल होत आहेत.
पाकच्या भ्याड हल्ल्याविषयी होता संताप..
बारामुल्लाच्या उरी येथील सैनिकी मुख्यालयावर दहशतवाद्यांनी गोळीबार व हँण्डग्रेनेडने हल्ला केला होता. 18 सप्टेंबरला झालेल्या या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 18 जवान शहीद झाले, त्यामध्ये महाराष्ट्रातील चार जवानांचा समावेश होता. या कारवाईमुळे पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, अशी मागणी सैन्यातून होत होती. सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या भ्याड हल्ल्यांविरोधात भारतीय सैन्यातही संतापाची लाट होती. 26/11 ते पठाणकोट हल्ला, असे कितीतरी हल्ले भारताने सहन गेले आहेत. त्यामुळे भारतीयांना सडेतोड उत्तराची अपेक्षा होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, कोण काय म्हणाले..