आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Need Full Electricity For Sustanable Development

शाश्वत विकासासाठी भारतास हवी अक्षय ऊर्जा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी होणारा नैसर्गिक संसाधनांचा नाश देशाला परवडणारा नाही. वेगाने विकसित होत असलेल्या भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेच्या गतीला हा नाश निश्चितच खीळ घालणारा आहे. त्यामुळे शाश्वत विकासासाठी अक्षय ऊर्जा अधिक महत्त्वाची आहे. 23 मार्चला रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत विजेचे दिवे बंद करून त्या दृष्टीने एक पाऊल टाकायचे असल्याचे आवाहन वर्ल्डवाइड फंड फॉर नेचरने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) केले आहे. सामाजिक-आर्थिक बदलाच्या या उपक्रमात भास्कर व दिव्य मराठी समूह डब्ल्यूडब्ल्यूएफचा भागीदार आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या विळख्यातून सुटका करून घेण्याचा हा एक मार्ग आहे. व्यक्ती, संस्था, संघटना यांनी जास्तीत जास्त संख्येने ‘अर्थ अवर’मध्ये सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी करायची आहे.

स्विच ऑफचे फायदे- गतवर्षी झालेल्या अर्थ अवर मोहिमेला देशात चांगला प्रतिसाद मिळाला. 2012 मध्ये भारतातील 150 हून अधिक शहरांनी रात्री एक तास विजेचे दिवे बंद करून या मोहिमेला पाठिंबा दर्शवला. देशातील किमान 30 राष्ट्रीय स्मारकांनी स्विच ऑफ केले. म्हैसूर राजवाड्यातील विद्युत रोषणाईची वेळ 15 मिनिटांवरून पाच मिनिटे करण्यात आली. मेट्रोपॉलिटन शहरातील स्विच ऑफमुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत झाली. नवी दिल्लीत एक तास विजेचे दिवे बंद ठेवल्याने 300 मेगावॅट विजेची बचत झाली. बंगळुरूत 90 मेगावॅट तर मुंबईत 60 मेगावॅट वीज बचत झाली.

भारताचा पुढाकार- पारंपरिक ऊर्जा व वीज निर्मिती साधनांमुळे वाढणारी आयात तूट लक्षात घेता अक्षय ऊर्जेचे महत्त्व लक्षात येते. भारतात वर्षातील 300 ते 330 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. हा सूर्यप्रकाश 5000 ट्रिलियन किलोवॅट अवर इतका आहे. हे प्रमाण भारतातील वार्षिक वीज वापरापेक्षा जास्त आहे. हे लक्षात घेऊन 1980 च्या दशकात अक्षय ऊर्जा मंत्रालय स्थापण्यात आले. असे करणारा भारत जगातील पहिला देश आहे.या मंत्रालयाने देशातील 48 शहरांची सोलार सिटी म्हणून निवड केली आहे. या शहरांतील पारंपरिक ऊर्जेचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मोहीम कशासाठी- पारंपरिक ऊर्जा निर्मितीतील नैसर्गिक संसाधनांचा नाश थांबवण्यासाठी. सध्या भारतात ऊर्जानिर्मितीसाठी कोळसा, गॅस आणि तेलाचा वापर केला जातो, हे टाळण्यासाठी. इंधनासाठी आयातीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत कोळशाची आयात 50 दशलक्ष टनांवर पोहोचली आहे, हे थांबवण्यासाठी. अपारंपरिक स्रोतातून ऊर्जानिर्मिती वाढण्यासाठी अर्थ अवर हे पहिले पाऊल आहे.