आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत कोणाच्या भूमीचा भुकेला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताने कधीही कोणावरही हल्ला केलेला नाही आणि ना आम्ही कोणाची भूमी बळकावण्यासाठी भुकेले आहोत, असे खडे बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानला सुनावले आहेत.

प्रवासी भारतीयांना लागणाऱ्या सोयीसुविधा देणाऱ्या प्रवासी भारतीय केंद्राचे रविवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद््घाटन झाले. या वेळी मोदी म्हणाले, राष्ट्रहित आणि मानवाच्या कल्याणाच्या कामी भारतीय जवान प्राणांची बाजी लावतात. परकीयांच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी दीड लाख सैनिकांनी मागील दोन जागतिक महायुद्धांत बलिदान केले. जागतिक समुदायाने हा त्याग लक्षात घ्यावा. परदेशात वसलेला भारतीय समुदाय सत्ता हस्तगत करण्यासाठी साठमारी करत नाही. किंबहुना तेथील समाजाच्या हितासाठी इतर समाजांच्या खांद्याला खांदा लावून साथ देतो, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

ब्रेन ड्रेनचे परिवर्तन ब्रेन गेनमध्ये : जगभरात विखुरलेले २.७ कोटी प्रवासी भारतीयांची संख्या ही एक शक्ती म्हणून बघितली तर ब्रेन ड्रेनचे रूप पालटून ते ब्रेन गेन ठरू शकते, असे सांगून मोदी म्हणाले. जगाला आता भारताशी जोडले जाण्याची आधीपेक्षा अधिक आतुरता आहे. अशा वेळी कुठली तरी अज्ञात भिती अडसर ठरू शकते. त्यामुळे आमचे प्रवासी तो दूर करण्यात मदत करू शकतात. आम्ही भारताचे आहोत एवढेच त्यांना जगाला सांगावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...