आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता डेबीट कार्डवर ग्राहकाचा फोटोही असणार, आरबीआयने जारी केले निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आता आपल्या डेबीट कार्डवरही आपला फोटो लागलेले असेल. एवढेच नाही तर ग्राहकांना कार्डसाठी विमा संरक्षणही मिळेल. त्यामुळे कार्ड हरवल्यास ग्राहकांना त्याचा फायदा होईल. आरबीआयने बँकांना यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. ज्या वेगाने देशात डेबीट कार्डचा वापर वाढत आहे, तेवढ्याच वेगाने यासंबंधी गैरव्यवहारांमध्येही वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय संस्था एसीआय वर्ल्डवाइडच्या ताज्या सर्व्हेक्षणानुसार अशा फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये भारत संपूर्ण जगामध्ये दुस-या क्रमांकावर आहे.

आरबीआयच्या प्रवक्या अल्पना किल्लावाला यांच्या मते बँकांनी ठरवले तर तत्काळ एटीएम (डेबीट कार्ड) वर किंवा त्याच्या नुतणीकरणावेळीही त्यावर फोटो प्रिंट करून देऊ शकता येते. सध्या केवळ अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डवरच अशा प्रकारचे फोटो आढळतात. तसेच बँकांना कार्डवर ग्राहकाची सही लॅमिनेट करून द्यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. सध्या कार्ड मिळाल्यानंतर ग्राहक त्यावर सह्या करतात.
त्यामुळे बनावट कार्ड तयार करणे सोपे जाते. त्याचे कारण म्हणजे त्यावर कोणालाही सही करता येते. इंटरनेट अँड मोबाइल असोसीएशन ऑफ इंडियाचे सल्लागार आणि दिल्ली-यूपीमध्ये साइबर क्राइमच्या तपासपथकाशी संलग्न असणारे रक्षित टंडन यांच्या मते, सरकारी खबरदारी असली तरी ग्राहकांनीही जागरूक राहायला हवे. कारण याबाबतीत ग्राहकांचा बेजबाबदारपणाच बहुतेकवेळा त्यांना नडतो. ते इतरांसमोर अनेकदा आपल्या खात्याविषयी माहिती उघड करत असतात. त्यामुळे ही माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. कधी-कधी एटीएम सेंटरवरच ग्राहकांबरोबर धोका होत असतो.

पुढील स्लाइडवर वाचा कसा होतो, फ्रॉड...