आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India PAK Foreign Secretary Level Meeting In February

पाक उच्चायुक्त बासीत म्हणाले, फेब्रुवारीत होणार परराष्ट्र सचिव स्तरावरील बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाक उच्चायुक्त अब्दुल बासीत म्हणाले, फेब्रुवारीत होणार परराष्ट्र सचिव स्तरावरील बैठक  परराष्ट्र सचिन एस जयशंकर पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांच्यासह. (फाइल फोटो) - Divya Marathi
पाक उच्चायुक्त अब्दुल बासीत म्हणाले, फेब्रुवारीत होणार परराष्ट्र सचिव स्तरावरील बैठक परराष्ट्र सचिन एस जयशंकर पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांच्यासह. (फाइल फोटो)
इस्लामाबाद - भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी दोन्ही देशांत फेब्रुवारी महिन्यात परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, आता ही चर्चा रद्द करायला काही कारणही नाही. दुसरीकडे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवकत्ते काझी खलीलउल्ला यांनी भारताने पाकिस्तानावर दहशतवादाचे खोटे आरेप करणे बंद करायला हवे, असे सुनावले आहे.

चर्चा रद्द व्हायला कारणच नाही...
- एका मुलाखतीदरम्यान बासीत म्हणाले की, भारताकडून पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात जे पुरावे देण्यात आले आहेत, त्यावर कारवाई सुरू आहे.
- अशा स्थिचीच दोन्ही देशांमध्ये चर्चा रद्द होण्याचे काहीच कारण नाही.
- ही चर्चा 15 जानेवारीला होणार होती. पण पठाणकोट एअरबेस अटॅकनंतर ही चर्चा रद्द करण्यात आली होती.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रेस कॉन्फरन्स
- दरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काझी खलीलउल्ला म्हणाले की, इस्लामाबाद नवी दिल्लीच्या संपर्कात आहे.
- आद्याप बैठकीची तारीख ठरलेली नाही, तसेच अजेंडाही ठरलेला नाही.
- दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर खोटे आरोप करणे बंद करायला हवे, असे त्यांनी सुनावले.
- दहशतवाद संपवण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका अवलंबवावी असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते अधिकारी...
- यापूर्वी एका पाकिस्तानी न्यूज वेबसाइटने दोन्ही देशांदरम्यान बैठकीबाबत एकमत झाल्याचा दावा एका वरीष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने केला होता.
- 'डॉन' वेबसाइटने सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केला होता. मात्र अद्याप तारीख ठरली नसल्याचे म्हटले होते.
- नाते सुधारण्याची प्रक्रिया दहशतवादी हल्ल्यांमुळे थांबणार नाही, हे यातून सिद्ध होईल असे अधिकारी म्हणाले होते.
- 15 जानेवारी रोजी दोन्ही देशांदरम्यान परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा होणार होती. पण पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यानंतर ती रद्द करण्यात आली.
- गेल्या आठवड्यात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी पठाणकोट हल्ला प्रकरणी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या चौकशीवर नजर असल्याचे म्हटले होते. दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

सुषमा स्वराज यांच्या दौऱ्यानंतर झाले होते एकमत
- डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या सुषमा स्वराज यांनी दोन्ही देशांमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह बायलॅटरल डायलॉग (द्विपक्षीय चर्चा) पुन्हा सुरी होणार असे संकेत दिले होते.
- 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही चर्चा थांबली होती.
- सुषमा स्वराज यांनी नवाज यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजिज यांना भेटल्यानंतर एकत्र पत्रकार परिषद घेतली होती.
- त्यावेळी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव भेटून चर्चेचा रोडमॅप ठरवतील असे ठरले होते.
- चर्चा केव्हा आणि कोणत्या स्तरांवर होणार हे यात ठरणार आहे.