आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत, पाकने काश्मीरचा फुटबॉल बनवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन्ही देशांच्या चर्चेवर भाजप आणि काँग्रेस राजकारण करत आहे. दोघांनीही निवडणुकीतील फायद्यासाठी त्याचा वापर करून घेतला आहे, असे पीडीपीचे नईम अख्तर म्हणाले. आम्ही पाकिस्तानच्या लोकशाही संघटनांच्या बाजूने आहोत, आयएसआयच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या नव्हे, असे काँग्रेसचे बी. आर. कुंडल म्हणाले.

काँग्रेस,पीडीपीचा प्रस्तावाला पाठिंबा : परिषदेचेचेअरमन अमृत मल्होत्रा यांनी प्रस्ताव मांडला होता. त्यास नॅशनल कॉन्फरन्स,काँग्रेस आणि पीडीपीने पाठिंबा दिला. यामध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार रोखण्यासाठी आणि गोळीबारात जखमी झालेल्या लोकांचे पुनर्वसन करण्याचाही आग्रह करण्यात आला आहे.
श्रीनगर- पाकिस्तानशीबोलणी पुन्हा सुरू करण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे राज्य सरकारने धरावा, अशी मागणी करणारा वादग्रस्त ठराव जम्मू-काश्मीर विधान परिषदेत गुरुवारी मंजूर करण्यात आला. ‘भारत आणि पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा फुटबॉल बनवला,’ असा अजब युक्तिवाद नॅशनल कॉन्फरन्सचे खालिद सुहरावर्दी यांनी केला. सुहरावर्दी म्हणाले की,‘कधी भारत खेळतो, तर कधी पाकिस्तान. दोन्ही देशांची मॅच फिक्सिंग झालेली आहे. सीमेवरील गोळीबार आणि बोलणी करण्याचा निर्णय त्याच मॅच फिक्सिंगचा एक भाग आहे. त्यात आज पाकिस्तान भारताला मदत करत आहे. उद्या भारत त्यांना मदत करेल.’
पाकिस्तानशी बोलणी करण्याचा केंद्राकडे आग्रह धरा
नॅशनल कॉन्फरन्सचा आरोप, जम्मू-काश्मीर विधानसभेत वादग्रस्त ठराव

जम्मू-काश्मीर बाबत बोलण्यास तयार : भारत
नवीदिल्ली जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर बोलणी करण्यास भारताने सशर्त तयारी दर्शवली आहे. बोलणी द्विपक्षीय असावी आणि सिमला लाहोर करारनाम्याच्या अंतर्गत व्हावी, असे पाकिस्तानला सांगितल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन गुरुवारी म्हणाले. परराष्ट्र सचिव पातळीवरील बोलणी रद्द झाल्यानंतर भारताकडून हे पहिलेच वक्तव्य आहे. अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. अजीज इस्लामाबादेत बोलताना म्हणाले होते की, भारतासोबत चर्चा करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे, परंतु काश्मीर मुद्द्यावर बोलणीशिवाय इतर मुद्द्यांवर चर्चा पाकिस्तानला मान्य नाही.
फ्लॅग मीटिंगनंतर काही तासांतच गोळीबार
जम्मू- प्रत्यक्षताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनाबद्दल दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बुधवारी फ्लॅग मिटींग झाली. मात्र, या मिटींगनंतर सात तासांच्या आत रात्री ११ च्या सुमारास पाकिस्तानी जवानांनी काही भारतीय चौक्या वसाहतींवर पुन्हा तुफान गोळीबार केला. रात्री सव्वा अकराच्या सुमारास अखनूर भागात देवरा वसाहतीवर पाक जवानांनी गोळीबार केला. अर्धा तास हा गोळीबार सुरू होता. यानंतर रात्री उशिरा दोन वाजता परगवाल सेक्टरमध्ये काही चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. पहाटे चारच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाल्याचे स्थािनक लोकांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी जवानांनी या ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २४ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले.