आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकची १९७१चनंतरची सर्वात मोठी आगळीक, तिन्ही सेनादल प्रमुखांशी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / जम्मू- सीमेवरील गोळीबार थांबला असला तरी सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक डी. के. पाठक यांच्या वक्तव्यामुळे चिंता वाढली आहे. पाठक यांच्या मते पाकिस्तानकडून आतापर्यंतचा सर्वाधिक काळ चाललेला हा गोळीबार आहे. ४५ दिवसांपासून गोळीबार सुरू होता. गोळीबाराच्या आडून २५ ठिकाणांहून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. तो बीएसएफने हाणून पाडला.

पाठक म्हणाले की, ‘आम्हाला शांतता हवी आहे, पण मूकदर्शक होऊन घरांवर गोळीबार होताना पाहू शकत नाही. सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ.’ पाकने नियंत्रण रेषेवर ९५ वेळा तर आंतरराष्ट्रीय सीमेवर २५ वेळा गोळीबार केला आहे. भारताचे लष्करी कारवाई महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल पी. आर. कुमार यांना मंगळवारी पाकिस्तानचे डीजीएमओ आमिर रियाझ यांच्याशी हॉटलाइनवरून १० मिनिटे चर्चा केली.

अरुण जेटलींची तिन्ही सेनादल प्रमुखांशी चर्चा
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी तिन्ही सेनादल प्रमुखांशी चर्चा केली. गृहमंत्री राजनाथसिंह २९ रोजी जम्मूला जाणार आहेत. गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह रॉ, आयबी, बीएसएफप्रमुखांशी सोमवारी चर्चा केली.