आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India, Pakistan Exchange More Gunfire Across LoC

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर द्या, केंद्र सरकारचे निर्देश बुलेटप्रुफ जॅकेट बंधनकारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - पाकिस्तानी लष्कराने चालवलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर द्यावे, असे निर्देश केंद्र सरकारने रविवारी दिले.

रविवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्याशी चर्चा केली. नंतर अँटनी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना विस्तृत माहिती दिली. दरम्यान, ताबा रेषेवर जवानांना बुलेटप्रुफ जॅकेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

(छायाचित्रातून पाहा, युद्धासाठी कसे तयार होतात पाकिस्तानी सैनिक)

पाकचा पुन्हा गोळीबार, भारतीय जवान जखमी : पाकने दोन दिवसांत तिसर्‍यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत रविवारी सीमेलगत भारतीय चौकीवर गोळीबार केला. यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. दरम्यान, 5 ऑगस्टला संभा सेक्टरमधील गोळीबारात जखमी झालेले बीएससफचे जवान रामनिवास मीना यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सकाळी साडेआठपासून पाक जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर तुफान गोळीबार सुरू केला. दुपारी दोन वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता.

अशा काढल्या कुरापती
- पाकिस्तानने शुक्रवारी रात्रीनंतर जम्मू सेक्टरमध्ये तिसर्‍यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
- शुक्रवारी रात्री साडेदहानंतर ताबा रेषेवर पाक जवानांनी 7 हजार राउंड फायर केले होते.
- चालू वर्षांत 57 वेळा पाकिस्तानने ताबा रेषेवर तसेच सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
- 6 ऑगस्टला पाक जवानांनी भारतीय हद्दीत घुसून पूंछ सेक्टरमध्ये भारतीय चौकीवर हल्ला करून पाच जवानांची हत्या केली होती.