आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India pakistan Foreign Secretaries Level Talks In New Delhi

सचिव स्तरीय चर्चेत भारताने पाकला सुनावले, दहशतवादाला निपटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अनेक वाद आणि अटकळीनंतर मंगळवारी अखेर भारत आणि पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र सचिव स्तरावर बैठक झाली. ही बैठक सुमारे ९० मिनिटे चालली. पाकिस्तानने नेहमीचा काश्मीर राग आळवला. त्यावरील तोडगा शोधण्यावर भर दिला.

भारताने मात्र अगोदर पाकिस्तानने दहशतवादाच्या मुद्द्यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. अन्यथा द्विपक्षीय संबंध पुढे जाऊ शकणार नाहीत, असे ठणकावले.
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी ‘हार्ट ऑफ एशिया-इस्तंबूल प्रोसेस’ संमेलनात सहभागी होण्यासाठी मंगळवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक सकाळी ११ च्या सुमारास साऊथ ब्लॉकमध्ये झाले. त्यात चर्चा संपण्याच्या अगोदरच पाकिस्तानकडून त्याचा संपूर्ण तपशील जाहीर करण्यात आले अशी आगळीक पहिल्यांदाच करण्यात आली. जयशंकर म्हणाले, पाकिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी भारतावरील हल्ल्यासाठी करतात. त्याला परवानगी मिळता कामा नये. दहशतवादामुळे उभय देशाच्या संबंधावर परिणाम होणार नाही, असे म्हणता येणार नाही. बैठकीत मासेमार, कैदी, तिर्थयात्रेकरू आणि सामान्य जनतेशी संबंधित मानवी पैलूंवरही चर्चा झाली.