आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत - पाकिस्तान परराष्ट्र सचिव दर्जाची चर्चा अनिश्चिततेच्या गर्तेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसोबत १५ जानेवारीपासून इस्लामाबादेत सुरू होणारी प्रस्तावित परराष्ट्र स्तरावरील चर्चा अनिश्चतेच्या फेऱ्यात अडकली आहे. त्याऐवजी आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) एकमेकांची भेट घेऊन पठाणकोट येथील हल्ल्यानंतर उद््भवलेल्या परिस्थितीवर विचार करू शकतात. या हल्यानंतर भारत उपलब्ध सर्व पर्यायांवर विचार करत आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे १४ जानेवारीला इस्लामाबादला जाणार आहेत. या भेटीत ते पाकिस्तानचे समकक्ष अधिकारी एजाज अहमद चौधरी यांच्याशी भेटून द्विपक्षीय व्यापक चर्चा पुढे नेण्यासाठी रोडमॅप तयार करणार आहेत. परंतु ही भेटदेखील अनिश्चित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अधिकृत सूत्रांनी सोमवारी सांगितले की, सरकार इस्मालाबादच्या या प्रस्तावित भेटींबाबत अनेक पैलू विचारात घेऊन सावध पावले उचलत आहे. पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्यामुळे िनर्माण झालेला तणाव निवळेपर्यंत परराष्ट्र सचिव स्तरीय बैठक लांबणीवर टाकण्याचा पर्यायदेखील सरकारच्या विचारधीन आहे. त्याऐवजी दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भेटू शकतात. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांदरम्यान दहशतवादासह इतर सर्व मुद्यांवर चर्चा करण्याचे ठरले आहे. परंतु इतर मुद्दे बाजूल ठेवून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दहशतवादाच्या मुद्यावरच चर्चा करतील.

अॉपरेशन संपल्यावरच निर्णय
केंद्रीयअर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर सांगितले, "पठाणकोट हवाईतळावरील कारवाई संपल्यानंतरच परराष्ट्र सचिवस्तरावरील चर्चेबाबत विचार केला जाईल.' दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या सहमतीअंतर्गत दहशतवादावर एनएसए चर्चा करतील. गेल्या महिन्यात बँकॉक येथे दोन्ही देशाचे एनएसएंची याबाबत पहिल्या टप्प्यात बोलणी झालेली आहे.
सीमावादावर होणार होती चर्चा, लवकरच पुढची तारीख