आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्दा-शब्दाने विस्कोट; चर्चेआधीच पाकने अटी लादू नये, भारताचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ श्रीनगर / इस्लामाबाद - भारत-पाकदरम्यान रविवारची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा संकटात आहे. त्यावरून शुक्रवारी नवी दिल्ली, श्रीनगर इस्लामाबादेत वेगाने घडामोडी झाल्या. कसेही करून काश्मिरातील फुटीर नेत्यांशी चर्चा करण्यावर पाक अाडून बसला आहे. भारताला ते मान्य नाही. सायंकाळी भारताच्या कठोर भूमिकेमुळे ही बैठक रद्द झाल्याची बातमी आली.तसे घडले नसले तरी बैठक होईलच याची खात्री नाही.
सकाळी : भारताचा कठोर संदेश
दिल्ली : परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले- बैठकी आधी किंवा नंतर हुरियतशी चर्चा मान्य नाही, हे १८ ऑगस्टला भारताला सांगितले.
दुपारी : हुरियतची हिंमत वाढली
श्रीनगर : शब्बीरशाह म्हणाले की, शनिवारी ते दिल्लीत येणार. फुटीर नेते दिल्लीत आले तर विमानतळावरच त्यांना अटक करू, असे गृहमंत्रालयाचे संकेत.
दुपारी : पाकचे उत्तर आले...
इस्लामाबाद : नवाजशरीफ सरताज अजीज यांनी लष्कर प्रमुख राहिलेल्या शरीफांची भेट घेतली. मग पाक म्हणाला- भारताच्या अटींवर चर्चा होणे नाही. हुरियत नेत्यांशी चर्चा करणारच.
सायंकाळी : पाकची चिथावणी
इस्लामाबाद : परराष्ट्रसचिव एजाज अहमद म्हणाले की, पाक हुरियतलाच जम्मू- काश्मीरचा खरा प्रतिनिधी मानतो. उफामध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यावर सहमती झाली होती.
दुपारी : पाकचे उत्तर आले... इस्लामाबाद : नवाजशरीफ सरताज अजीज यांनी लष्कर प्रमुख राहिलेल्या शरीफांची भेट घेतली. मग पाक म्हणाला- भारताच्या अटींवर चर्चा होणे नाही. हुरियत नेत्यांशी चर्चा करणारच.

जयपूर : परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले की, बैठकीत कोणीही तिसरा घटक नसेल. पाकिस्तानने अटी लादणे थांबवावे.तसे असेल तर चर्चा संकटात येऊ शकते. रात्री उशिरा पाकचेही उत्तर आले. जुन्याच मुद्द्यांची नव्याने कॅसेट वाजवली.
अजित डोभाल यांची बहुचर्चित वक्तव्ये
- नेपोलियन म्हणत होता- जीवनात एकच वेळ मरायचे आहे. मग ते तलवारीने असो की अणुबॉम्बने. अणुयुद्ध झाले तरी जगात अस्तित्व सिद्ध करू एवढे आम्ही (भारत) नक्कीच वाचू. परंतु राष्ट्र म्हणून जगातील पाकिस्तानचे अस्तित्वच संपुष्टात येऊन जाईल.
- तुम्ही (पाकिस्तान) आमच्यावर १०० दगड माराल तर कदाचित ९० दगडांपासून आम्ही स्वत:चा बचाव करू. तरीही आम्हाला १० दगड लागतीलच. तुम्ही त्याचाच फायदा घेत आहात. आम्हाला आक्रमक व्हावे लगेल. तुम्ही आणखी एक २६/११ घडवाल तर बलुचिस्तानला मुकाल हे त्यांना आपण ठणकावून सांगितलेच पाहिजे.

पुढील स्लाइडवर वाचा, पाक मीडियात चर्चा : अजीजसाहेब घरीच बसा, तुमची डाळ शिजणार नाही!