आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Pakistan Relation, Abdul Basit, Divya Marathi

पाकिस्तान उतरला आता शिरजोरीवर, बोलणी करून भारत उपकार करत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीमेवर सातत्याने गोळीबार करत असलेला पाकिस्तान आता शिरजोरीवर उतरला आहे. सीमेवरील युद्धबंदीच्या उल्लंघनाचे खापर पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासीत यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भारतावरच फोडले. बासीत म्हणाले की, गेल्या वर्षभरात भारताने ५७ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. भारत- पाकिस्तानच्या संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाकडे दुर्लक्ष करत काश्मिरातील फुटीरतावाद्यांशी आमच्या सरकारची चर्चा सुरूच राहील, असेही बासीत यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानची ही शिरजोरी पाहून भारताकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आले. सायंकाळपर्यंत भारताकडून बासीत यांच्या प्रत्येक युिक्तवादाची तपशीलवार िचरफाड करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यापासून ते भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यापर्यंत सर्वांनीच तपशीलवार खुलासे केले आणि पाकिस्तानचे मुद्दे खोडून काढले. गेल्या दोन दिवसांपासूनचा घटनाक्रम पाहता भारत-पाकिस्तान संबंध आणखी ताणले जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दिल्लीत पाक राजदूताच्या उलट्या बोंबा म्हणे भारतानेच ५७ वेळा युद्धबंदी मोडली काश्मिरी फुटीरतावाद्यांशी आम्ही २० वर्षांपासून चर्चा करत आहोत, पुढेही करू

या प्रश्नांवर पाक राजदूताची बोलती बंद
फुटीरतावाद्यांशी चर्चा करून पाकिस्तानने राजनैतिक शिष्टाचाराच्या उल्लंघनाची चूक केली नाही का? काश्मिरींशी चर्चा करण्याचा नेमका हेतू काय आहे? पाकिस्तानने नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीला चर्चेसाठी का बोलावले नाही?

पाकच्या युक्तिवादाचे भारताकडून खंडन

१. युद्धबंदीचे उल्लंघन

पाक : बासीतम्हणाले- गोळीबार आमच्याकडूनच झाल्याचे तुम्हाला वाटते. पण मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून आजपर्यंत भारताने ५७ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे, हे मी आपणाला सांगू इच्छितो.

भारत: कश्‍मीरातील लष्कराचा प्रवक्ता म्हणाला, १० िदवसांत पाकने १० वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले. पाकची फुटीरतावाद्यांशी चर्चा रोखण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाही पूंछमध्ये गोळीबार सुरूच होता.

२.फुटीरतावाद्यांशी चर्चा
पाक: आम्हीगेल्या २० वर्षांपासून काश्मिरींशी चर्चा करत आहोत. भावनेच्या आहारी जाता काश्मीर प्रश्नाकडे नि:ष्पक्षपातीपणे पाहिले पाहिजे. आम्ही सर्व संबंधितांशी चर्चा करतच राहणार आहोत.

भारत: परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अकबरुद्दीन म्हणाले, फुटीरतावादी काही ‘पक्षकार’ नाहीत. काश्मीरवर दोनच पक्ष आहेत, एक आम्ही आणि दुसरे तुम्ही.

३.बोलणी रद्द करण्याच्या मुद्द्यावर

पाक : बासीतम्हणाले, बोलणी करून भारत पाकिस्तानवर उपकार करत नाही. आम्हाला धक्का बसला आहे. पण त्यामुळे आम्ही निराश झालेलो नाही. मुत्सद्देगिरीची दारे कधीच बंद होत नाहीत.

भारत: परराष्ट्रमंत्रालय म्हणाले, अंतर्गत बाबींत ढवळाढवळ मान्य नाही. पाकची भूमिका सिमला करार, लाहोर जाहीरनाम्यािवरुद्ध आहे.

४.दहशतवादाबाबत भूमिका

पाक : दोनमहिन्यांत आमच्या भूमीतून अतिरेक्यांचा बीमोड होईल. वजिरीस्तानमध्ये सैन्याची मोहीम सुरू आहे. आम्ही स्वत:च दहशतवादाने होरपळलेलो आहोत. सर्वाधिक त्रास आम्हालाच भोगावा लागला आहे.

भारत:अकबरुद्दीनम्हणाले, शांतता प्रक्रियेसाठी आम्ही बांधील आहोत आणि भारताविरुद्ध आमच्या भूमीचा वापर होऊ देणार नाही, असे पाकिस्तानने आधीही म्हटले होते.