आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Pakistan Relation News In Marathi, Pakistan Occupied Kashmir

तस्करीच्या मुद्दय़ावर भारत-पाकिस्तानची उद्या होणार चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या 17 जानेवारीला पाकव्याप्त काश्मीरमधून 100 कोटींच्या अंमली पदार्थांची तस्करी करत असलेल्या चालकाला अटक करण्यात आली होती. यावरून नियंत्रणरेषेवर तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी दिल्ली येथे उभय देशांच्या प्रतिनिधींच्या बैठक होणार आहे. नियंत्रण रेषेवर होणार्‍या अवैध व्यापाराच्या मुद्दय़ावर तोडगा काढण्यासंदर्भात या बैठकीत बोलणी होणार आहे. काश्मीरच्या दोन्ही बाजूने येणार्‍या व्यापारातील अडथळ्यासंबंधी चर्चा होणार आहे.


4 मार्चला होणार्‍या या बैठकीला पाकिस्तानचे दक्षिण अशियाचे महासंचालक रिफात मसूद तर भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियंत्रणरेषेवरील व्यापार करणार्‍यांशीही या बैठकीपूर्वी विचारविनिमय करण्यात येणार आहे. बैठकीत व्यापारी संबंध सुदृढ होण्यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. आयात-निर्यात वस्तूंच्या संख्येत वाढ करणे आणि अवैध उत्पादनांवर नियंत्रण आणण्यासंबंधीची नियमावली ठरवण्याच्या प्रमुख उद्देशाने चर्चा होणार आहे. यात परराष्ट्र , गृह, अर्थ मंत्रालयाचे प्रतिनिधी तसेच बॅँक, सुरक्षा यंत्रणा, लष्कराचे आणि राज्याच्या अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. व्यापारासाठी पारंपरिक वस्तुविनिमय पद्धती न वापरता बॅँकिंगच्या माध्यमातून व्यापारवृद्धी केल्यास उभय राष्ट्रांना त्याचा लाभ होईल.