नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेला मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार दाऊद इब्राहिम,हाफिज सईद व लखवी यांची संपत्ती सील करण्यासाठी भारत पाकिस्तानवर दबाव वाढवणार आहे.भारतीय गुप्तचर संस्थांनी या तिन्ही अतिरेक्यांच्या २८ संपत्ती शोधून काढल्या आहेत. कराची, इस्लामाबाद आणि पाकिस्तानच्या पंजाबमध्ये त्यांचे कारखान्यांशिवाय रिअल इस्टेट, १० मॉल आणि ५ फार्महाऊस आहेत. या संपत्तीची यादी गृह मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाकडे दिली आहे. पाकिस्तान सरकारला देण्यासाठी परराष्ट्र सचिव ही यादी लवकरच पाकिस्तानी राजदूतांना देतील. त्यानंतरही पाकिस्तानने संपत्ती सील केली नाही तर भारत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत या प्रकरणी दबाव वाढवेल. मागील दोन वर्षात दाऊद आणि सईदच्या पाकमधील संपत्तीत चारपट वाढ झाली आहे.