आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाने नाही दिली भारत-पाकिस्तानला मध्यस्थीची ऑफर, परराष्ट्र मंत्रालयाने केले स्पष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, रशियाने भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची कोणतीही ऑफर दिलेली नाही. - Divya Marathi
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, रशियाने भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची कोणतीही ऑफर दिलेली नाही.
नवी दिल्ली/इस्लामाबाद- रशियाने भारत-पाकिस्तानच्या प्रश्नांवर मध्यस्थी करण्याची कुठलीही ऑफर दिली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण पाकिस्तानी माध्यमांमध्ये यासंदर्भातील वृत्त आल्यानंतर दिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या काही दिवसापुर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करताना भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे हे वृत्त होते.

काय म्हटलंय परराष्ट्र मंत्रालयाने

- हे प्रकरण गुरुवारी दुपारी सुरु झाले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस जकारिया यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले की शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीदरम्यान पुतिन यांनी नवाज शरीफ यांना भारत-पाकिस्तानच्या दरम्यान मध्यस्थीची ऑफर दिली होती?
- यावर जकारिया म्हणाले की, आपण रशियाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. दोन्ही देशावर अनेक मुद्दांवर विवाद आहे. हे मुद्दे सोडविल्याशिवार पुढे जाणे अशक्य आहे. 

रशियाला माहित आहे भारताची भूमिका

- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांना याविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी रशियाकडून अशी ऑफर आल्याचा इन्कार केला.
- बागले म्हणाले, रशियाला माहित आहे की या मुद्दयावर भारताची भूमिका काय आहे. भारत-पाकिस्तानमधील मुद्दे हे दोन्ही देशांनी मिळुनच सोडवायचे आहेत. 

रशियाने नाकारली ऑफर दिल्याची बाब

- रशियाच्या राजदुताने अशी कोणतीही ऑफर आपल्या देशाने दिल्याचे नाकारले आहे.
- राजदुताने सांगितले की, अशा कोणत्याही ऑफरची माहिती आमच्याकडे नाही. रशिया असा कोणताही प्रयत्न करत नाही. दोन्ही देशांनी त्यांचे प्रश्न स्वत:च चर्चेतुन सोडवायचे आहेत. पाकिस्तानची मात्र रशियाने मध्यस्थी करावी अशी इच्छा असू शकते. 
बातम्या आणखी आहेत...