आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India, Russia To Sign Deal For Anti tank Ammunition

रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदीस मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्यास केंद्र सरकारने सोमवारी मंजुरी दिली. याअंतर्गत भारत रशियाकडून 66 हजार रणगाडाभेदी तोफगोळे (अँटी टँक शेल्स) खरेदी करणार आहे. या शिवाय रशिया भारताला तोफगोळ्यांचे तंत्रज्ञानही देणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा प्रकरणांच्या कॅबिनेट समितीने काही दिवसांपूर्वी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की येत्या काही दिवसांत यासंबंधीच्या करारावर स्वाक्षर्‍या होऊ शकतील. याअंतर्गत रशिया भारताला केवळ रणगाडाविरोधी तोफगोळेच विकणार नाही तर ते तयार करण्याचे तंत्रज्ञानही तो भारताला देईल. सरकार टी 90 रणगाड्यांसोबतच चिलखतधारी तुकडीला दारूगोळ्यांनी सज्ज करण्यासाठी हा सौदा करणार आहे. त्यासाठी रशियासोबत मिळून संयुक्त उपक्रम सुरू करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतल्याने त्याचे उत्पादन भारतातच करणे शक्य होईल.

व्ही. के. सिंहांनी वेधले होते लक्ष : भारतीय लष्करात दारुगोळ्यांचा साठा अपुरा असल्याच्या मुद्याकडे माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी दोन वर्षांपूर्वी लक्ष वेधले होते. त्यानंतर अनेक लष्करी अधिकार्‍यांनीही त्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर सरकारने या शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणास गती दिली.