आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन्‍काऊंटर स्‍पेशालिस्‍टचा मुलगा बनला IPS, 16 वर्षांचा असताना वडीलांची झाली होती हत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशातील टॉप एन्‍काऊंटर स्‍पेशालिस्‍टमधील एक दिल्‍ली क्राईम ब्रांचचे एसीपी राजबीर सिंह यांचा मुलगा रोहित सिंह आयपीसएस बनला आहे. 50पेक्षा जास्‍त एन्‍काऊंटर केलेले आणि दिल्‍लीचे सुपरकॉप म्‍हणून ओळखले जाणारे राजबीर सिंह यांची 2008मध्‍ये गोळी घालुन हत्‍या करण्‍यात आली होती. आपल्‍या वडीलांच्‍या बहादुरीचे किस्‍से ऐकतच मोठा झालेल्‍या रोहितनेही लहानपणीच पोलिस बनण्‍याचा निश्‍चय केला होता. 
 
रोहितने मानली नाही हार 
- दिल्‍ली पोलिसमध्‍ये भरतीझाल्‍यानंतर राजबीर सिंह 13 वर्षांतच एसीपी बनले होते. 
- आपल्‍या सेवेदरम्‍यान त्‍यांनी 50पेक्षा जास्‍त एन्‍काऊंटर केले. 
- पैशांचा वादावरुन 24 मार्च, 2008रोजी एका प्रॉपर्टी डीलरने गुडगाव येथे त्‍यांची हत्‍या केली होती. 
- मृत्‍यूनंतर त्‍यांच्‍या पश्‍चात आईवडील, पत्‍नी, मुलगी आणि मुलगा एवढे कुटुंब होते. 
- हत्‍या झाली तेव्‍हा राजबीर सिंह यांचा मुलगा रोहित 11वीत शिकत होता. 
- या घटनेचा त्‍यांच्‍या कुटुंबाला प्रचंड धक्‍का बसला होता. मात्र रोहित याने हार मानली नाही. 

16 वर्षांचा होता राहुल 
- पित्‍याची हत्‍या झाली तेव्‍हा रोहित 16 वर्षांचा होता. 
- दिल्‍ली पब्लिक स्‍कूलमध्‍ये तो 11वीच्‍या वर्गात शिकत होता. 
- आपल्‍या पिताच्‍या कर्तबगारीचे किस्‍से ऐकतच तो मोठा झाला होता. त्‍यामुळे पोलिस बनण्‍यासाठी इंजिनअरींग केल्‍यानंतर त्‍याने युपीएससीची तयारी सुरु केली. 

रोज 17-18तास केला अभ्‍यास 
- देशातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाणारी युपीएससी पास होण्‍यासाठी रोहित रोज 17-18 तास अभ्‍यास करत असे. 
- 2015मध्‍ये तो या परीक्षेत उत्‍तीर्ण झाला. 
- हैदराबादेतील ट्रेनिंगनंतर रोहितला मनाप्रमाणे दिल्‍ली केडर मिळाले. 
पटेल नगरचे एसीपी 
- सध्‍या रोहित राजबीर सिंह पटेल नगरमध्‍ये एसीपी म्‍हणून काम करत आहेत. 
- आतापर्यंत त्‍यांनी खून, दरोडे अशा अनेक गंभीर प्रकरणांचा छडा लावला आहे. 
- दिल्‍लीमध्‍ये महिलांवर होणा-या अत्‍याचाराला रोखणे, ही आपली पहिली प्राथमिकता असल्‍याचे रोहितने सांगितले आहे. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज... 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...