आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मियाँ की दौड मस्जिद तक! UN मध्ये पाकच्या काश्मिरी रागाला भारताचे चोख प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्‍त राष्‍ट्र/ दिल्‍ली- पाकिस्‍तानने पुन्‍हा एकदा संयुक्‍त राष्‍ट्रामध्‍ये काश्‍मीर प्रश्‍नावर चर्चा करण्‍याची मागणी केली आहे. यावर भारताचे वरिष्‍ठ मुत्‍सद्दी अधिकारी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकला चोख ऊत्‍तर दिले आहे. त्‍यांनी म्‍हटले आहे की, 'संयुक्‍त राष्‍ट्रामध्‍ये या मुद्द्यावर दशकांपासून चर्चा झालेली नाही.  अशात पाकिस्‍तानने यावर चर्चेची मागणी करणे म्‍हणजे 'मियाँ की दौड मस्जिद तक' असला प्रकार आहे. अ‍कबरुद्दीन संयुक्‍त राष्‍ट्रामध्‍ये भारताचे स्‍थायी प्रतिनिधी म्‍हणून काम पाहतात.

भारताचा फोकस विकासाच्‍या अजेंड्यावर- अकबरुद्दीन
- संयुक्‍त राष्‍ट्राच्‍या आमसभेला संबोधित करताना सय्यद अकबरुद्दीन म्‍हणाले की, ' भारत विकासाच्‍या दिशेने आगेकूच करत आहे. आम्‍ही हाच अंजेडा घेऊन पुढे जात आहोत. अशात असे काही राष्‍ट्र आहेत जे अजुनही जुन्‍याच, कालबाह्य मुद्द्यांविषयी चर्चा करत आहेत. यावरुन असे लोक जुन्‍याच विचारांमध्‍ये अडकलेले आहे, हे आपल्‍याला समजून येते.
 
23 तारखेला संयुक्‍त राष्‍ट्राला संबोधित करणार सुषमा स्‍वराज
- अकबरुद्दीन पुढे म्‍हणाले की, पाकिस्‍तानला अशा मुद्द्यांवर चर्चा करायची आहे जे युएनच्‍या टेबलवर कित्‍येक दशकांपासून आलेले नाहीत. हे मुद्दे आता जुने झाले आहेत. मात्र तरीही त्‍यांना तसे करायचे असेल तर त्‍यांची इच्‍छा.
- येत्‍या 23 सप्‍टेंबरला भारताच्‍या परराष्‍ट्रमंत्री सुषमा स्‍वराज यांचे संयुक्‍त राष्‍ट्रामध्ये भाषण होणार आहे, अशी माहितीही अकबरुद्दीन यांनी दिली आहे.
- पाकिस्‍तानचे नवे प्रधानमंत्री शाहिद खाकन अब्‍बासी हेखील याच आठवड्यात युएनमध्‍ये भाषण करणार आहेत. यावेळी ते काश्‍मीरचा मुद्दा उचलतील, अशी माहिती पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने दिली आहे.

भारताने आधीही म्‍हटले आहे, हे अंतर्गत प्रकरण
- याआधी मुस्लिम देशांची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ द इस्‍लामिक कोऑपरेशनद्वारे (OIC) पाकिस्‍ताने संयुक्‍त राष्‍ट्रामध्‍ये काश्‍मीरविषचा प्रश्‍न उचलला होता.
- तेव्‍हा भारताने म्‍हटले होते की, काश्‍मीर हा भारताचा अविभाज्‍य भाग आहे. त्‍यामुळे (OIC) संघटनेला भारताच्‍या अंतर्गत प्रकरणांमध्‍ये हस्‍तक्षेप करण्‍याचा कोणताही हक्‍क नाही.
संयुक्‍त राष्‍ट्रामध्‍येही भारताने दिले होते सडेतोड प्रत्‍युत्‍तर
- संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये चर्चेदरम्‍यान भारताचे मुत्‍सद्दी अधिकारी श्रीनिवास प्रसाद यांनी पाकिस्‍तानला खडे बोल सुनावले होते. ते म्‍हणाले होते की, काश्‍मीर भारताचा अविभाज्‍य भाग असूनही (OIC) संघटनेने यासंबंधी चुकीची माहिती युएनमध्‍ये सादर केली आहे. भारत याचा पुर्णपणे नकार करतो. पाकिस्‍तान 'कल्चर ऑफ पीस'च्‍या नावाखाली काश्‍मीर प्रश्‍नाबद्दल बोलत आहे. मात्र सर्वांनाच माहित आहे की, पाकिस्‍तानने नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे.'
 
नेमके काय म्‍हटले पाकिस्‍ताने
- युएनमधील कल्‍चरल फोरमच्‍या चर्चेदरम्‍यान पाकिस्‍तानचे अधिकारी मलीहा लोधी यांनी काश्‍मीरचा मुद्दा उकरुन काढला होता.
- यावेळी ते म्‍हणाले हाते की, 'युएनमध्‍ये कित्‍येक वर्षांपासून काही प्रश्‍न मार्गी लागलेले नाहीत. त्‍यामुळे अनेकजणांवर अन्‍याय होत असून त्‍यांच्‍या मौलिक अधिकारांचे हनन होत आहे.'
 
बातम्या आणखी आहेत...