आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळ्या पैशांच्या तपासात स्वित्झर्लंडने मदत वाढवावी - राजनाथ सिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काळ्या पैशांच्या उच्चाटनासाठी स्वित्झर्लंडने आपल्या मदतीत वाढ करावी. त्यामुळे आमच्या देशातील बेकायदा पैशाला नष्ट करणे शक्य होऊ शकेल, अशी मागणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. दहशतवादासह अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांत सहकार्य करण्यावर गुरुवारी चर्चा झाली.

स्वित्झर्लंडचे न्याय विभागाचे मंत्री सिमोनेट्टा सोमारुगा यांच्याशी झालेल्या चर्चेत राजनाथ यांनी भारताची भूमिका मांडली. भारत- स्वित्झर्लंड संबंध आणखी वेगाने पुढे जायला हवेत, असे आम्हाला वाटते. काळ्या पैशांच्या मुद्द्यावर करविषयक माहिती मिळायला हवी. त्यामुळे देशातील काळ्या पैशांचे सत्य समोर येऊ शकेल. त्याचबरोबर कारवाईचा मार्गही मोकळा होऊ शकेल. काळा पैसा, भ्रष्टाचार यासारख्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहाेत. त्यात स्वित्झर्लंडनेही सहकार्य करावे, अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. भारत-स्वित्झर्लंड यांनी प्रादेशिक शांतता व स्थैर्यासाठी चांगले योगदान दिले आहे. त्यामुळे प्रदेशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वाने भविष्यातही सहकार्य करण्यावर भर दिला आहे. उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार, गुंतवणुकीवरही चर्चा झाली. त्याशिवाय भारतीय पोलिस अधिकाऱ्यांना स्वित्झर्लंडच्या पोलिस अकादमीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने अपहरण प्रतिबंधक, सायबर फॉरेन्सिकच्या क्षेत्रात स्वित्झर्लंडकडून भारताला मदत मिळणार आहे. उभय देशांत गुन्हेगारांच्या हस्तांतरणावरही सहमती झाली. शिक्षा झालेल्यांना गुन्हेगारांना हस्तांतरित केले जाणार आहे. फौजदारी प्रकरणांतही परस्परांना सहकार्य करण्यात येणार आहे.

तीन सामंजस्य करार
भारत-स्वित्झर्लंड यांच्यात व्हिसासंबंधीच्या तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. उभय देशांनी तीन करारांवर सहमती दर्शवली. राजकीय पासपोर्ट, आेळखपत्राची तांत्रिक व्यवस्था, बेकायदा स्थलांतरितांना मायदेशी आणण्याची सोय या कराराच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...